नेहमी वर्दळ असणाऱ्या ठाणे रेल्वे स्टेशनवर एका महिलेचा जीव थोडक्यात वाचला. रेल्वे पोलिसांनी वेळीच धाव घेत महिलेला प्लॅटफॉर्मच्या दिशेने ओढल्यानं महिलेला जीवदान मिळालं. काही क्षणात घडलेला हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये गर्दीची वेळ असताना एक एक्स्प्रेस गाडी दाखल झाली. गाडीची गती कमी होत असतानाच ही घटना घडली. स्थानकात दाखल झालेल्या गाडीची गती काहीशी कमी झाल्यानंतर एका महिलेने उतरण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात महिलेचा पाय घसरला आणि ती कोसळली. महिला अडकून रेल्वेखाली खेचली जात असतानाच रेल्वे पोलिसांनी धाव घेतली. महिलेला प्लॅटफॉर्मच्या दिशेनं ओढत पोलिसांनी महिलेचा जीव वाचवला.
#WATCH | Two Railway Protection Force (RPF) personnel and a civilian rescue a woman at the Thane Railway Station, Maharashtra, from being swept under an oncoming train at a platform (9.1.2021) pic.twitter.com/D4YUQHigEr
— ANI (@ANI) January 10, 2021
काही दिवसांपूर्वी दहिसर स्थानकावर अशीच भयंकर घटना टळली होती. एक ६० वर्षांची व्यक्ती रेल्वे ट्रॅक ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्म जात होती. मात्र, जात असताना अचानक रेल्वे ट्रॅकमध्ये व्यक्तीचा पाय अडकला. तिने झटका देऊन पाय काढला. पण बूट निघाला. त्यामुळे व्यक्तीने बाजूला जाऊन पायात बूट घातला. यावेळी लोकल रेल्वे अगदी काही पावलांवर आली होती. तरीही त्या व्यक्तीने रेल्वे ट्रॅक ओलांडला. लोकलखाली येण्याची भीती असतानाच पोलिसामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 10:37 am