राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला गुरूवारी अपघात झाला. गुरूवारी संध्याकाळी नागपूरला परतत असताना चंद्रपूर येथे हा अपघात झाला. या अपघातात त्यांचे चार सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजीव तुली यांनी मोहन भागवत सुरक्षित असल्याची माहिती दिली. तसेच जखमी सुरक्षा रक्षकांपैकी एकाच्या पायाला दुखापत झाल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही 6 ऑक्टोबर 2017 रोजी मोहन भागवत अपघातातून बचावले होते. उत्तर प्रदेशातील यमुना महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 16, 2019 7:33 pm