सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनेलने बाजी मारली असून, सह्याद्रीचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यासह त्यांचे दोन सहकारी तब्बल ९ हजार २६८ मताधिक्याने विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांना सरासरी १८ हजार ६३ तर, विरोधी यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांना ८ हजार ७९५ मते मिळाली आहेत. मताधिक्याची हिच सरासरी कायम राहण्याची चिन्हे आहेत.
सह्याद्री साखर कारखान्याचे २१ संचालक निवडण्यासाठी परवा मंगळवारी कारखान्याच्या ५ तालुक्यांच्या कार्यक्षेत्रातील ९१ मतदान केंद्रांवर ७७ टक्क्यांवर मतदान झाले होते. आज सकाळी ८ वाजल्यापासून येथील शासकीय गोदामामध्ये मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ झाला. प्रारंभी मतपत्रिकांची वर्गवारी करून गठ्ठे करण्यात आले. अन् प्रत्यक्ष निकाल देण्यास सायंकाळचे साडेचार वाजले. सत्ताधारी आघाडीने मताधिक्याची निर्णायक आघाडी घेतल्याने विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण अन् फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला. एकंदर निकाल जाहीर होण्यास आणखी काही तास लागणार असले, तरी सत्ताधा-यांच्या निर्णायक आघाडीमुळे निवडणुकीचा एकतर्फी कौल निश्चित झाला आहे.

Chandrashekhar Bawankule
औषधी संचावर पंतप्रधानांचा फोटो का नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांना प्रश्न
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी