19 September 2020

News Flash

१२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत करणार ठाकरे सरकार

राज्यभरातल्या मजुरांना दिलासा देण्यासाठी सरकारचा निर्णय

संग्रहित छायाचित्र

१२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी २ हजारांची मदत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्यातील मजुरांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. करोनाच्या संकटकाळात या मजुरांचे सर्वाधिक हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ३ मे पर्यंत देशभरात लॉकडाउन आहे. अशात या लॉकडाउनचे सर्वाधिक चटके बसत आहेत ते मजूर वर्गाला. त्यांना काहीसा का होईना आर्थिक दिलासा देता यावा म्हणून हा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सध्या सगळ्या प्रकारची बांधकामं बंद आहेत. त्यामुळे या मजुरांवर बेकारीचं संकट ओढवलं आहे. अशा परिस्थितीत इतर राज्यांनीही मजुरांना मदत केली आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारनेही मदतीचा हात या सगळ्यांना दिला आहे.

आणखी वाचा- बच्चू कडूंचा स्तुत्य उपक्रम,गरिबांना अवघ्या दोन रूपयांत जेवण

करोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढतो आहे. करोनाग्रस्तांची देशातली संख्या लक्षात घेतली तर सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. अशा सगळ्या परिस्थिती बांधकाम कामगारांना आर्थिक अडचण सहन करावी लागते आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येकी २ हजारांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

आणखी वाचा- लॉकडाउन राहणारच, पण टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला देणार गती – अजित पवार

बांधकाम मजुरांचा हक्काचा पैसा महाराष्ट्र राज्य बांधकाम मजूर मंडळात जमा आहे. जमा असलेली रक्कम ९ हजार कोटींच्या घरात आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून सेसच्या रुपाने ही रक्कम राज्य सरकारकडून घेतली जाते. त्यामुळे आता करोनासारखा संकट काळ समोर आलेला असताना बांधकाम मजुरांच्या खात्यात पैसे जमा केले जावे असा प्रस्ताव राज्याच्या कामगार विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला होता. त्यानुसार मदतीच्या स्वरुपात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयास मंजुरी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 3:02 pm

Web Title: rupees two thousand will be deposited in bank accounts of 12 lakh labourers in maharashtra says thackeray government
Next Stories
1 “जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांची आम्ही काळजी घेतोय”; वर्धा जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा
2 सैयदना बुरहानी ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची मदत
3 चिमुकल्यांसाठी स्पर्धा : घरी बसून होऊ शकता सहभागी
Just Now!
X