News Flash

३० टन प्राणवायूची गरज

मर्यादित ऑक्सिजन पुरवठ्यामुळे पेच

(संग्रहित छायाचित्र)

वसई- विरार महानगरपालिका क्षेत्राला दररोज २० मेट्रिक टन तर उर्वरित पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला दहा मेट्रिक टन प्राणवायूची गरज भासत असून द्रव्य रूपातील प्राणवायू पुरवठा रायगड जिल्ह्यातून डोलवी व पेण जवळी केंद्रातून भरून आणणे आवश्यक आहे.

या करिता टँकरची उपलब्धतेची समस्या असून जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या काही टँकरना प्राणवायूचा वाहतुकीसाठी अधिग्रहित करण्याचा जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील अधिकांश प्राणवायू वितरक हे रिफीलिंगचे काम करीत असून द्रव्यरूपातील प्राणवायू पुरवठा वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र सद्यस्थितील त्याचा तुटवडा आहे.

रेमडेसिविर संदर्भात मार्गदर्शक सूचना

रेमडेसिविर इंजेक्शनच्या वितरण व्यवस्थे संदर्भात राज्य शासनाने काढलेल्या आदेशाच्या अनुरूप जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून करोना उपचार करणाऱ्या रुग्णालयांकडून आलेल्या मागणीची पडताळणी केल्यानंतर रुग्णालयांना थेट रेमडेसिविर इंजेक्शन देण्याचे सर्व वितरकांना सूचित करण्यात आले आहे. या इंजेक्शनची अधिकतम किंमत न घेता खरेदी किमती, कर रक्कम व १० टक्के नफा इतकीच दर आकारणी करण्यात येणार आहेत. रेमडेसिविर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडे जिल्हा प्रशासनाने थेट मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 12:54 am

Web Title: rural area of palghar district needs ten metric tons of oxygen abn 97
Next Stories
1 डहाणू शहरातील पश्चिम भागात पाणीटंचाई
2 प्राणवायूचाही काळाबाजार?
3 वसई-विरारमधील उपचाराधीन रुग्ण साडेपाच हजारांपेक्षा अधिक
Just Now!
X