लावणी सुरू झाली आणि पाय थिरकले नाही असे होणे नाही. त्यातही ‘आता वाजले की बारा’ म्हटल्यावर तर विचारणेच नको. लावणीच्या प्रेमात एखादी महाराष्ट्रीय व्यक्ती पडणे यात विशेष नाही. परंतु, जेव्हा परदेशी पाहुणेही लावणीवर थिरकतात तेव्हा सर्वच स्तब्ध होतात. परदेशी पाहुण्यांना लावणीवर नृत्य करताना पाहण्याची संधी नांदगावकरांना उपलब्ध झाली ती येथील अध्यापक विद्यालयात. त्यासाठी निमित्त ठरले रशिया व भारतीय सांस्कृतिक, शैक्षणिक विभागातंर्गत विकास व सांस्कृतिक विचारांच्या आदान-प्रदान कार्यक्रमाचे.
रशियातील लारिसा शुबिना, नतालिया लिकोव्हा, एलिना व्होलोश्चूक, स्वेतलाना अबारेनोव्हा, सेरगे अबारेनोव्हा, इरिना बोर्शचेन्को या पाहुण्यांनी सांस्कृतिक विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी अध्यापक विद्यालयाचे एस. जे. िशदे यांच्या आग्रहास्तव नांदगाव गाठले. नऊवारी साडीतील या पाहुण्यांना बलगाडीतून अध्यापक विद्यालयात आणण्यात आले. मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक दिलीप पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर महाराष्ट्रदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाला. भजन, कीर्तन, भूपाळी, वासुदेव आदी संस्कृतीचे महत्त्व मांडणारे कार्यक्रम तसेच विविध कलागुणांचे आविष्कार उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. प्रत्येक गाण्यास व नृत्यास पाहुण्यांकडून दाद मिळू लागली. सृष्टी सरोदे ‘आता वाजले की बारा’ या लावणीवर थिरकायला लागताच पाहुण्यांनाही लावणीची भुरळ पडली. पाहुणेही नाचू लागले. त्यांचा उत्साह पाहून मग इतर विद्यार्थी व शिक्षकांनीही नृत्याचा फेर धरला.
या कार्यक्रमाचा मूळ हेतू रशियन व भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार करणे हा होता. यावेळी शेतीसह महाराष्ट्रीय संगीत, गीत, खाद्य संस्कृती तसेच राहणीमान यांचा रशियन पाहुण्यांनी नांदगाव येथे अभ्यास केला. कार्यक्रमास संजीव धामणे, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष शकुंतला कवडे उपस्थित होते. सूत्रसंचालन नयना पठणकर यांनी केले.

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…