राज्यात वाढीव वीज बिलांवरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपाकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर शब्द फिरवल्याचा आरोप होतो आहे. अशात भाजपाच्या या आरोपांची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी खिल्ली उडवली आहे. एक फेसबुक पोस्ट लिहून सचिन सावंत यांनी भाजपाची चेष्टा केली आहे. “मोदी सरकारने आर्थिक व्होल्टेज कमी करुन सगळा लोड राज्यावर टाकला आहे. अशा वेळी मविआ सरकारने वीज बिलं कमी करावीत म्हणून अंगातून इलेक्ट्रीक करंट गेल्याप्रमाणे नाचणारे भाजपा नेते यावर गप्प बसले आहेत. या दांभिक भाजपाकडे लक्ष न देता जनतेला दिलासा कसा द्यायचा ते पाहू” अशी पोस्ट लिहित सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.

लॉकडाउनच्या काळात घरगुती ग्राहक आणि कार्यालयांना वीजेची भरमसाठ बिलं आली. यावरुन गदारोळ निर्माण जाल्यानंतर वाढीव वीज बिलांमध्ये सवलत दिली जाईल अशी भूमिका सुरुवातीला राज्य सरकारने घेतली होती. मात्र त्यानंतर काहीही ठोस हालचाली घडल्या नाहीत. अशातच उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कुठलीही वीज बिल माफी मिळणार नाही असं सांगितलं. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लावून बसलेल्या ग्राहकांना शॉक बसला होता.

वीज बिलांच्या सवलतीवरुन राज्य सरकारने घूमजाव केल्यानंतर भाजपाने सोमवारी वीज बिलांची होळी करण्याचं आंदोलन सोमवारी केलं. आता वीज बिल माफी मागणाऱ्या भाजपा नेत्यांची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी खिल्ली उडवली आहे. मोदी सरकारने आर्थिक व्होल्टेज कमी करुन सगळा लोड राज्यावर टाकला आहे. अशा वेळी मविआ सरकारने वीज बिलं कमी करावीत म्हणून अंगातून इलेक्ट्रीक करंट गेल्याप्रमाणे नाचणारे भाजपा नेते यावर गप्प बसले आहेत. या दांभिक भाजपाकडे लक्ष न देता जनतेला दिलासा कसा द्यायचा ते पाहू असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे.