मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व्याघ्रदर्शनाच्या ओढीने जंगल सफारीवर गेला आहे. सचिनने आपल्या या जंगल सफारीबाबत कमालीची गुप्तता ठेवली होती. दरम्यान सचिनचा स्थानिकांसोबतचा एक फोटो व्हायरल झाला आहे.
सचिन शनिवारी सकाळीच नागपूरजवळील उमर्डे कऱ्हांडला अभयारण्यात पोहचला. सचिनने या अभयारण्यातील स्वत:चा एक फोटोही ट्वीट केला आहे. तसेच त्याने ट्वीट केले की, “मी निसर्गदेवतेच्या सानिध्यात आहे. निसर्गाचा आणि जंगलाचा अनुभव घेतोय. ओळखा आता मी कुठे आहे?


काही दिवसांपूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सचिनला व्याघ्रदूत होण्याचे निमंत्रण दिले होते.