29 May 2020

News Flash

सचिनचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलं मराठीतून ट्विट

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. रयतेच्या सुखासाठी त्यांनी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा’ पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिला. अगदी कमी वयात त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर स्वप्न सत्यात उतरवले. अशा शिवाजी महाराजांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने जयंतीनिमित्त मानाचा मुजरा केला आहे.

‘प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी बेधडकपणे लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांना मानाचा मुजरा’, असे सचिनने ट्विट केले आहे. तसेच सचिनने श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज ह्यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभाव मानणारे होते. धर्मवेडाने राज्य मोठे होत नाही. सर्व धर्मासंबंधी सहिष्णू भाव असल्याने राज्य मोठे होते अशी ही राजांची ठाम धारणा होती. अन्यायी, जुलमी आणि धार्मिक अत्याचार करणाऱ्या मुस्लिम राजवटीविरुद्ध महाराज लढले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आपल्या हिंदू धर्माचे महाराजांनी रक्षण तर केलेच. पण त्या बरोबरच इतर धर्मांचाही आदर केला. मशिदी, कुराण या मुसलमानांच्या श्रद्धास्थानांना आपल्या सैनिकांनी कोणताही उपद्रव देऊ नये अशी सक्त ताकीद शिवाजी महाराजांनी दिली होती. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व स्तरातून त्यांना मानाचा मुजरा करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2020 11:20 am

Web Title: sachin tendulkar pays tribute to chatrapati shivaji maharaj with marathi tweet vjb 91
Next Stories
1 IPL 2020 : राजस्थान संघातील खेळाडूच्या कारला मोठा अपघात; कारचा चक्काचूर
2 डोकं फुटेल… विराटचा फोटो वापरून पोलिसांनी दिला इशारा
3 ICC Women’s T20 World Cup 2020 : ‘सत्ता’ कुणाची?
Just Now!
X