News Flash

“त्या मर्सिडीजसोबत भाजपा पदाधिकाऱ्याचा फोटो, भाजपाचे नेते याचा खुलासा करतील का?”

काँग्रेसने पोस्ट केला फोटो

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. (छायाचित्र । इंडियन एक्स्प्रेस)

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास करत असलेल्या एनआयएच्या पथकाने एक मर्सिडीज कार ताब्यात घेतली आहे. या कारमध्ये पैसे आणि नोटा मोजण्याचं मशीन सापडलं आहे. यावरून पुन्हा एकदा राजकारण तापू लागलं आहे. ही कार वाझे यांनी वापरल्याचं वृत्त असून, काँग्रेसने भाजपा पदाधिकाऱ्याचे मर्सिडीजसोबतचा फोटोच पोस्ट केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र भाजपाचे नेते याचा खुलासा करतील का?, असा सवालही उपस्थित केला आहे.

अंबानी स्फोटकं प्रकरणाचा तपास करत असताना एनआयएने सोमवारी रात्री सचिन वाझे यांच्या मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात छापा टाकला होता. आठ तासांच्या शोध मोहिमेत वाझे यांच्या कार्यालयातून दोन डीव्हीआर (सीसीटीव्ही चित्रण साठविण्याचे यंत्र), लॅपटॉप, मोबाइल, आयपॅड, संगणक आणि काही कागदपत्रे एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतली होती. त्याचबरोबर मंगळवारी काळ्या रंगाची मर्सिडीज जप्त केली होती. ही मर्सिडीज वाझे यांनी वापरल्याचा संशय आहे. त्यामुळे भाजपाकडून पुन्हा एकदा वाझे यांना निशाणा केलं जात आहे.

आणखी वाचा- विनंती! देवेंद्र फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; ‘सीडीआर’वरून काँग्रेसने दिला सल्ला

तर दुसरीकडे काँग्रेसने या मर्सिडीजसोबत भाजपा पदाधिकाऱ्यांचा फोटो ट्विट केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. आता यात भाजपासोबतचे कनेक्शन समोर येत आहे. मनसुख हिरेन वापरत असलेल्या मर्सिडीज १७ फेब्रवारी रोजी ठाणे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या फोटोत दिसत आहे. महाराष्ट्र भाजपाचे नेते यावर खुलासा करतील का?,” असा सवाल सावंत यांनी केला आहे.

आणखी वाचा- सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाल्या…

आणखी वाचा- घटनाक्रम! स्कॉर्पिओ, मनसुख हिरेन मृतदेह ते सचिन वाझेंना अटक; कोणत्या दिवशी काय घडलं?

पैसे, कपडे, आणि नोटा मोजण्याचं मशीन

दक्षिण मुंबईतून जप्त करून पेडर रोड येथील कार्यालयात आणलेल्या मर्सिडीज गाडीची तपासणी एनआयए अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास केली. या वेळी सचिन वाझे यांनाही कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले होते. या गाडीत रोख रक्कम, कपडे, कागदपत्रे आढळली. रोख रक्कम एनआयए अधिकाऱ्यांनी वाझे यांच्यासमोरच मोजली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या गाडीवरील नोंदणी क्रमांक धुळे येथील एका व्यक्तीच्या मर्सिडीज गाडीचा आहे. समाजमाध्यमांवर या व्यक्तीचे गाडीसोबतचे छायाचित्रही आढळले आहे. जप्त केलेली काळ्या रंगाची मर्सिडीज वाझे वापरत होते. या कारमधून पाच लाखांपेक्षा जास्त रोकड, नोटा मोजण्याचे यंत्र, काही कपडे आणि स्कॉर्पिओच्या नोंदणी क्रमांक पाट्या आदी हस्तगत करण्यात आले. ही कार कोणाची याबाबत तपास सुरू आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणात पीपीई किटमधील व्यक्ती कोण याबाबतही तपास सुरू आहे, असे एनआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:27 pm

Web Title: sachin vaze case nia probe black mercedes car used by waze recovered congress bjp leaders fadnavis chandrakant patil bmh 90
Next Stories
1 विनंती! देवेंद्र फडणवीसांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये; ‘सीडीआर’वरून काँग्रेसने दिला सल्ला
2 ज्वारीपेक्षा चिंचोके महाग
3 मुद्रांक विक्री काळा बाजाराकडे डोळेझाक
Just Now!
X