तब्बल २० लाख गुंतवणूकदारांना दोन हजार कोटी रूपयांचा गंडा घालणाऱ्या ‘साईप्रसाद प्रॉपर्टीज लिमिटेड’च्या अध्यक्ष बाळासाहेब भापकर याला आर्थिक गुन्हे विभागाकडून अटक करण्यात आली.

तब्बल डझनभर कंपन्यांच्या माध्यमातून जादा व्याजदर आणि दामदुपटीचे आमिष दाखवून भापकर याने गुंतवणूकदारांना फसविल्याचा आरोप आहे. वांद्रे-कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्य़ात दोन महिलांसह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनाही लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती सह पोलीस आयुक्त धनंजय कमलाकर (आर्थिक गुन्हे शाखा) यांनी दिली.

pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
pimpri chinchwad cp vinay kumar choubey marathi news
पिंपरीत ‘चौबे पॅटर्न’, पोलीस आयुक्तांनी ३९ आरोपींवर लावला मोक्का; आतापर्यंत एकूण ३९६ आरोपींवर कारवाई
parful patel
प्रफुल पटेल यांना निर्दोषत्व! विमान भाडेकरार घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून फाइल बंद
Farmers in Navi Mumbai Airport Notified Impact Area oppose amended DCPR
नैनातील शेतकऱ्यांचा सूधारित युडीसीपीआरला विरोध

जादा व्याजदर तसेच साप्ताहिक आणि मासिक रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून सुमारे २० लाख गुंतवणूकदारांकडून त्याने तब्बल दोन हजार कोटी रूपये गोळा केले होते. भापकर याच्या गोव्याच्या ‘साईप्रसाद प्रॉपर्टीज लिमिटेड’ आणि पुण्याच्या ‘साईप्रसाद फुड्स लिमिटेड’ या कंपन्यांविरोधात सेबीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.