शिर्डी हे देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी द्वारकामाईत साईबाबांनी त्यांचे आयुष्य व्यतित केले. याच द्वारकामाईत साईबाबांची प्रतिमा उमटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मंदिर सफाई करताना स्थानिक ग्रामस्थांना आणि भक्तांना साईबाबांची प्रतिमा द्वारकामाईच्या भिंतीवर दिसली आणि ही बातमी शिर्डीत अगदी वाऱ्यासारखी पसरली.

त्यानंतर भक्तांची मंदिरात एकच गर्दी झाली. अनेकांनी हे फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केले. त्यानंतर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. काही प्रत्यक्षदर्शींनी भिंतीवर प्रतिमा दिसल्याचा दावा केला आहे.

दोन वर्षांपूर्वीही साईबाबांची प्रतिमा दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आता पुन्हा त्याच पद्धतीने साई बाबांची प्रतिमा दिसल्याची श्रद्धा आहे. याबाबत साईबाबा मंदिर संस्थानने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र हे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून शिर्डीतली गर्दी वाढली आहे.

बुधवारी रात्री ११ च्या सुमारास साईबाबांची प्रतिमा दिसल्याचा दावा काही भक्तांनी केला आहे. आम्ही मंदिरात साफसफाई करत होतो त्याचवेळी द्वारकामाई येथे अचानक गर्दी झाली. त्यानंतर द्वारकामाई येथे प्रतिमा उमटली. आमच्या समोर साईबाबांचा चेहरा उमटला असा दावा दिल्लीतील भक्तांनी केला. तर साईबाबांची शेज आरती झाल्यावर द्वारकामाई या ठिकाणी गेलो होतो तेव्हा भिंतीवर आम्हाला साईबाबांची प्रतिमा दिसली असा दावाही काही भक्तांनी केला आहे. प्रतिमा दिसली हे भक्तांचे म्हणणे आहे. मात्र यावर शिर्डी संस्थानने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाहा व्हिडिओ