नागराज मंजुळेच्या आतापर्यंतच्या सर्व सिनेमात काम केलेला सुरज पवार या बालकलाकाराच्या कुंटुंबियांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. नागराजसमवेत वास्तव्यास असणाऱ्या सुरजचे कुटुंबिय करमाळा तालुक्यातील पोफळज येथे राहते. त्याच्या आजी व आजोबांसह कुंटुंबातील इतर मंडळींना गावकऱ्यांनी बुधवारी रात्री मारहाण केल्याचा प्रकार घडला. यासंदर्भात गुरुवारी करमाळ्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय युवतीने पोलिसात फिर्याद नोंदविली आहे. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, बुधवारी सांयकाळी साडेसात वाजता विठ्ठल क्षीरसागर , सचिन पवार, प्रवीण पवार, अविनाश पवार, राजेंद्र सुरवसे, श्रीनाथ पवार, विलास धुमाळ आणि विकास रगडे यांनी नवऱ्याची विचारपूस करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नाही तर यावळी त्यांनी घरावर दगडफेक केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी घरातील वस्तुंची तोडफोड केली आहे. या घटनेची माहिती सुरजलाही देण्यात आली असून त्याच्या घराभोवती सुरक्षिततेसाठी पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!