25 September 2020

News Flash

‘सैराट’चे बेकायदेशीर प्रदर्शन रोखले

चित्रपट प्रदर्शनासाठी वापरण्यात आलेले २६ हजार रुपये किमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले

Sairat record : सशक्त कथानक ही नेहमीच मराठी चित्रपटांची ताकद राहिली आहे.

‘सैराट’ चित्रपटाची डीव्हीडी बनवून सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर प्रदर्शन करणाऱ्यांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी वापरण्यात आलेले २६ हजार रुपये किमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. राज्यभरातील प्रेक्षकांवर सध्या ‘सैराट’ चित्रपटाचे गारूड आहे. प्रदर्शनाच्या पाचव्या आठवडय़ातही चित्रपटाचे बहुतांश शोज हाऊसफुल्ल होत आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या या चित्रपटाने कमाईचे उच्चांक प्रस्थापित केले आहे. त्यामुळे चित्रपटाच्या बेकायदेशीर डीव्हीडीज बनवून बाजारात आणल्या जात आहेत. कॉपी राइट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी यापूर्वीच तक्रार दाखल केली असली तरी चित्रपटाच्या बेकायदेशीर डीव्हीडीज बाजारात विकल्या जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 2:21 am

Web Title: sairat movie illegal show stop
टॅग Sairat
Next Stories
1 ताडोबा व्याघ्र प्रकल्प १ जुलैपासून पर्यटकांसाठी अंशत: खुला ठेवणार
2 ‘मस्तिया’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात
3 परिवर्तनवादी विचारांनी समाजव्यवस्था बदलू शकते
Just Now!
X