प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर निराधार आरोप करीत अटकेची मागणी केली असून याबाबत राज्य शासनाने भीमा-कोरेगाव प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे निवेदन शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी गुरुवारी  दिले आहे.

गुरुजींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे, की १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीवेळी मी उपस्थित होतो व कारणीभूत आहे असे विधान केले आहे. प्रत्यक्षात त्या दिवशी मी सांगली मुक्कामी असताना त्यांनी माझ्यावर हा आरोप केला आहे. मला याकूब मेमनची वाट दाखविण्याची मागणी केली आहे. मी व माझे कार्यकत्रे आसेतू सारा हिंदुस्थान एकरूप करण्याचा प्रयत्न करीत असताना हे करण्यात आलेले आरोप निराधार आहेत. शासनाने याची सखोल चौकशी करावी.