27 September 2020

News Flash

प्रकृती बिघडल्याने संभाजी भिडे रुग्णालायात

पुण्याहून रायगडकडे परतत असताना भिडे गुरुजींची प्रकृती अचानक बिघडली अशीही माहिती समोर येते आहे

शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब कमी झाल्याचा (Low BP) त्रास होत असल्याने त्यांना महाड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती प्राथमिक सूत्रांकडून समोर आली आहे. संध्याकाळच्या सुमारास त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असू त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. संभाजी भिडे पुण्याला गेले होते, तिथून रायगडकडे येताना त्यांना अचानक त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

संभाजी भिडे यांच्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभा असतात त्याच धावपळीमुळे त्यांना हा त्रास झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. ‘न्यूज १८ लोकमत’ या वाहिनीने हे वृत्त दिले आहे. दरम्यान जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवप्रतिष्ठानकडून सांगलीमध्ये निषेध करण्यात आला. राज्यकर्त्यांच्या निष्क्रियतेमुळेच देशावर आक्रमणं होत आहेत. तर देशाचे शत्रू देशातच फोफावत असल्याचंही यावेळी संभाजी भिडे म्हणाले होते. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या रक्तगटाची पिढी निर्माण व्हावी ही काळाची गरज आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 9:20 pm

Web Title: sambhaji bhide hospitalized in mahad hospital for low blood pressure
Next Stories
1 सामूहिक विवाह सोहळ्यात अभिनेता अक्षय कुमारकडून ७९ जोडप्यांना ७९ लाखांची भेट
2 पाकिस्तानचे पाणी अडवले, आता पाकिस्तानलाच अडवा-आठवले
3 राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत?
Just Now!
X