02 March 2021

News Flash

अटकेला घाबरू नका, नामजप करत रहा : सनातनची साधकांना सूचना

संस्थेचे विरोधक सनातन संस्था आणि संस्थेचे साधक यांच्यावर ‘राष्ट्रविरोधी संघटना’ असा ठपका ठेवून संस्थेवर बंदी घालण्याचा खटाटोप करत आहेत, असा उल्लेख करण्यात आला आहे.

सनातन संस्थेच्या 'सनातन प्रभात' या संकेतस्थळावरुन साधकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश आणि गोविंद पानसरे हत्याप्रकरणात संशयित आरोपींची अटक तसेच नालासोपाऱ्यातून वैभव राऊतला झालेली अटक या प्रकरणात कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा संबंध असल्याचा आरोप होत आहे. याचा संदर्भ देत सनातनने साधकांना सूचना दिल्या आहेत. निरपराध हिंदूंना अटक होत असल्याने साधकांमध्ये भीती निर्माण होणे स्वाभाविक असून अशी भीती वाटत असल्याने नामजप आणि प्रार्थना करत राहावी, असे सनातनने म्हटले आहे.

सनातन संस्थेच्या ‘सनातन प्रभात’ या संकेतस्थळावरुन साधकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यात म्हटले आहे की, निरपराध हिंदूंच्या अटकसत्रामुळे अशाच प्रकारे मलाही चुकीची अटक होऊ शकते अशी नाहक भीती साधकांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत साधकांनी नामजप आणि प्रार्थनेचे प्रमाण वाढवावे. अशा प्रकारच्या कारवाया झाल्या, तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. हे आत्तापर्यंतच्या विविध घटनांमधून समोर आले आहे, असेही यात शेवटी म्हटले आहे.

सनातन प्रभात या संकेतस्थळावर आणखी एक सूचना करण्यात आली आहे. सनातन संस्थेचे विरोधक सनातन संस्था आणि संस्थेचे साधक यांच्यावर ‘राष्ट्रविरोधी संघटना’ असा ठपका ठेवून संस्थेवर बंदी घालण्याचा खटाटोप करत आहेत, असा आरोप यात करण्यात आला आहे. विरोधकांचे हस्तक जिज्ञासू असल्याचा तसेच सनातनच्या कार्यात रस असल्याचे सांगून सनातनचे आश्रम किंवा साधकांच्या निवासस्थानी येऊन काही आक्षेपार्ह वस्तू ठेवू शकतात. त्यामुळे अशा अनोळखी व्यक्तींपासून लांब रहावे व त्यांना आश्रमाच्या आवारात येऊ देऊ नये, असे देखील यात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 1:04 pm

Web Title: sanatan sanstha issues advisory for supporters and sadhak after nalasopara ats raid
Next Stories
1 विजू मामांनी गाजवलेली ‘ही’ नाटके माहित आहेत का ?
2 विजय चव्हाण यांच्या निधनाने महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला- विनोद तावडे
3 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X