News Flash

सांगली पोलीस मुख्यालय परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

आठ महिन्यात दुसऱ्यांदा घडला चोरीचा प्रकार

सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर गाडीने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

सांगली पोलीस मुख्यालयाच्या परिसरातून पुन्हा एकदा चंदनाच्या झाडांची चोरी झाली. २० ते २५ वयोगटातील सात-आठ जणांनी बुधवारी मध्यरात्री करवतीच्या साहाय्याने मुख्यालय परिसरातील तीन झाडे कापली. त्यानंतर दोन ओंडके घेऊन चोरटे पसार झाले. याप्रकरणी विश्रामबाग पोलीसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सांगली मुख्यालयातील हॉलच्या शेजारी घनदाट झाडी आहे. बुधवारी मध्यरात्री सात ते आठ जणांनी या परिसरात घुसून करवतीच्या साहाय्याने तीन झाडे कापली. झाडाच्या फांद्या काढून दोन ओंडके त्यांनी चोरुन नेले, अशी माहिती पोलिसांनी दिली. मागील आठ महिन्यातील चंदनाच्या झाडांच्या चोरीची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी देखील मुख्यालयातील परिसरातून अशा प्रकारची चोरी झाली होती. यावेळी आरोपींना पकडण्यात पोलीसांना अपयश आले होते. पोलिसांनी याप्रकरणाचा गांभीर्याने तपास केला असता तर आज पुन्हा चोरी झाली नसती, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 1:05 pm

Web Title: sandalwood trees stolen from police headquarter once again in sangli
Next Stories
1 सर्वोच्च न्यायालयाने कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीची ‘ती’ याचिका फेटाळली
2 BLOG | अहो कारभारी.. हे वागणं बरं नव्हं..
3 खामगाव-जालना रेल्वेमार्ग उपेक्षितच!
Just Now!
X