News Flash

सांगली : दारूसाठी उठला आईच्या जिवावर; पैसे न दिल्यानं केली हत्या

संशयित तरुणाला कोल्हापुरातून पोलिसांनी अटक केली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

तीस हजाराची मागणी पूर्ण करण्यास नकार देणाऱ्या मातेचा मुलानेच दारूच्या नशेत धारदार शस्त्राने खून केल्याचा प्रकार जतमध्ये घडला. यातील संशयित तरुणाला कोल्हापुरातून पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, जतमध्ये दुधाळ वस्तीवर राहणारा श्रीकांत राजाराम जाधव याने आई मंजुळा जाधव (वय ४५) हिचा गुरुवारी रात्री धारदार हत्याराने वार करून खून करण्याचा प्रकार घडला. श्रीकांत हा जतमध्ये जीपवर चालक म्हणून काम करीत असतो. रात्री घरी आल्यानंतर त्याने मद्यधुंद अवस्थेत आईकडे ३० हजार रुपये मागितले. मात्र आईने हे पसे देण्यास नकार दिला. यातून दोघामध्ये वादावादी झाली. या वादावादीतच त्याने महिलेवर हल्ला केला.

याबाबत मृत महिलेची विवाहित मुलगी स्वाती गायकवाड यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकारानंतर संशयिताने कोल्हापूरला प्रयाण केले होते. काल त्याला कोल्हापुरातून ताब्यात घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 1:43 pm

Web Title: sangali young boy murder mother due to money nck 90
Next Stories
1 ‘मंत्रिमंडळ विस्ताराचा लवकरच निर्णय, खातेवाटपही अंतिम टप्यात’
2 कांद्याची भाववाढ; तीन महिन्यापूर्वीच केंद्राला इशारा दिला होता : शरद पवार
3 अल्पवयीन मुलीस डांबून ठेवून बलात्कार, हिंगोलीतून सुटका
Just Now!
X