सर्पदंशामुळे सांगलीत सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून परिसरात स्वच्छता केली जात नसल्यानेच ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढत महावितरणचा निषेध केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगलीतील विश्रामबाग येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची वसाहत असून या वसाहतीत राहणाऱ्या केदार चव्हाण (वय ७ वर्षे) या मुलाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. वसाहतीत स्वच्छता केली जात नसल्याने परिसरातील सापांचा वावर वाढल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli 7 year old boy dies in snake bite
First published on: 21-09-2018 at 13:10 IST