News Flash

सांगली महापालिकेचा आज निकाल

काँग्रेस व राष्ट्रवादी या राज्यातील सत्ताधारी आघाडीमधील नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे गाजलेल्या सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेचा निकाल आज, सोमवारी जाहीर होणार आहे. रविवारी या तिन्ही शहरांत मिळून

| July 8, 2013 05:36 am

काँग्रेस व राष्ट्रवादी या राज्यातील सत्ताधारी आघाडीमधील नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे गाजलेल्या सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेचा निकाल आज, सोमवारी जाहीर होणार आहे.
रविवारी या तिन्ही शहरांत मिळून महापालिकेसाठी ६० ते ६५ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान ठिकठिकाणहून सुमारे १००हून अधिक हुल्लडबाज कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. प्रभाग २२ मधील काँग्रेसचे उमेदवार श्यामराव रामचंद्र मुळके यांचे पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. या प्रभागातील मतदान प्रक्रिया निर्धारित वेळेत सुरु  झाली होती. मात्र उमेदवार मुळके यांच्या निधनाचे वृत्त समजताच अध्र्या तासाने म्हणजे आठ वाजल्यानंतर मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. मतदान चालू ठेवायचे की नाही, यावरु न वडर कॉलनी येथे दोन गटात वादावादी झाली. या वेळी हुल्लडबाज कार्यकर्त्यांकडून दगडफेकही झाली. मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करुन स्थिती नियंत्रणाखाली आणली.
सांगली,मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरांचे ७७ प्रभागांमध्ये मतदान शांततेत पार पडले. मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी फारसा उत्साह आढळून आला नाही. सकाळी अकरा वाजल्यानंतर बहुसंख्य मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांची तुरळक ये-जा सुरु  होती. दुपारी तीन वाजल्यानंतर पुन्हा मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली.
 मतदान केंद्राच्या ठिकाणी असणारी दुकाने, हॉटेल्स पोलिसांनी बंद  केली होती. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये वाहने लावण्यास अथवा जमावबंदी आदेशानुसार कार्यकर्त्यांना थांबण्यास मज्जाव करण्यात आला होता. नियंत्रण रेषेच्या बाहेर मात्र मतदारांना नेण्या-आणण्यासाठी रिक्षा, जीप, सुमो यांचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून आले. अशी मतदारांची वाहतूक करणारी काही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
फिरत्या पोलीस पथकाद्वारे हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना लाठीचा प्रसाद बऱ्याच प्रभागात मिळाला. मिरजेतील लक्ष्मी मार्केट, िदडी वेस, सांगलीतील पंचशील नगर, िशदे मळा, वडर कॉलनी आदी ठिकाणी पोलिसांच्या लाठीचा प्रसाद कार्यकर्त्यांना खावा लागला. या पथकांकडे व्हिडिओ कॅमेरा होता. या कॅमेराद्वारे गैरप्रकारांचे चित्रीकरण करण्यात येत होते.
महापालिकेसाठी सर्वच प्रभागात शांततेने मतदान प्रक्रिया पार पडली असल्याचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांनी सांगितले. सांगली, मिरज, विश्रामबाग आणि कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाणे अंतर्गत शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात येणार असल्याचेही डॉ. प्रधान यांनी सांगितले.
प्रभाग २२ मध्ये मतमोजणीची प्रक्रिया मतदानानंतर तत्काळ करण्यात येणार होती. मात्र, उमेदवाराच्या निधनानंतर येथील मतदानच स्थगित झाल्याने मतमोजणी होणार नसल्याचे निवडणूक कार्यालयातून सांगण्यात आले. अन्य ७७ प्रभागाची मतमोजणी मिरजेतील वखार महामंडळाच्या गोदामात उद्या (सोमवारी) होणार आहे. मतमोजणीसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत सर्वच प्रभागातील निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.  काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी विकास आघाडी, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कुपवाड शहर विकास आघाडी असे पक्ष व संघटना निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विजयाचा दावा केला असून महापालिकेतील सत्ता एकमुखी मिळेल असा विश्वासही या पक्षाच्या शिलेदारांनी व्यक्त केला आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 5:36 am

Web Title: sangli corporation poll result comes out today
टॅग : Congress,Ncp,Sangli
Next Stories
1 गडचिरोलीतील चकमकीत सहा नक्षलवादी ठार
2 अजित पवारांच्या सभा सगळीकडे झाल्या, तर आमचं काय होईल? – पतंगराव कदम
3 सांगलीमध्ये जयंत पाटलांना धोबीपछाड; कॉंग्रेसला ४० जागा
Just Now!
X