महाराष्ट्राच्या सांगलीतील मिरज शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड रूग्णांसाठी रूग्णालय चालवणा-या एका डॉक्टरला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. करोना उपचारादरम्यान रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टराला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर महात्मा गांधी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

अ‍ॅपेक्स केअर हॉस्पिटल चालवणारे ३६ वर्षीय डॉ. महेश जाधव यांना न्यायालयीन कोर्टाने शनिवारी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक रूग्णालयात पुरेशी डॉक्टर, उपकरणे व इतर सोयीसुविधा नसल्याची माहिती तपासणीनंतर समोर आली आहे.

dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे
Agnel School, 17 Year Old Student, Drowns in Navi Mumbai, Swimming Pool, 17 Year Old Student Drowns, Agnel School Student Drowns, Student Drowns Swimming Pool, vashi Agnel School, marathi news,
नवी मुंबई : शाळेतील विद्यार्थ्यांचा तरण तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू
Haryana school bus accident,
VIDEO : शाळेच्या बसला भीषण अपघात; पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

हे ही वाचा >> करोना उपचारासाठी अधिक पैसे घेणाऱ्या डॉक्टरावर गुन्हा

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, १४ एप्रिलला एमबीबीएस, एमएस (प्लॅस्टिक सर्जन) आणि एमसीएचची पदवी असल्याचे सांगणाऱ्या डॉ. महेश जाधवला स्थानिक पालिका आयुक्तांनी कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली होती. मात्र, २१ मे रोजी तक्रारी आल्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्या नेतृत्वात पालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी केली असता रूग्णांना उपचार न देता रुग्णांकडून जास्त शुल्क आकारले जात असल्याचे समजले.

वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि आरोग्य सेवा संचालनालयाने ठरवलेल्या अटी व मार्गदर्शक तत्त्वे रुग्णालयातर्फे अमलात आणली जात नसल्याचे अंबोले यांना आढळले. २७ मे रोजी अंबोले यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली. २९ मे रोजी पोलिसांनी पंचनामा केला असता त्यांना आढळले की रुग्णालयात तीन डॉक्टर नेमलेले आहेत पण त्यापैकी कोणीही पूर्णवेळ कर्तव्यावर नव्हते.

हे ही वाचा >> मेडिकलमध्ये तोतया डॉक्टरला पकडले!

“४३ दिवसांत २०७ रुग्ण दाखल झाले आणि त्यापैकी ८७ मरण पावले. रुग्णालयात उपचारासाठी डिफ्रिब्रिलेटर, एक्सरे, सक्शन मशीन किंवा ईसीजी मशीन सारखी मूलभूत उपकरणे नव्हती. तेथे फक्त एक व्हेंटिलेटर आणि १० बीआयपीएपी मशीन्स होती. आम्ही याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे, ”अशी माहिती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.

“गेल्या वर्षी होमिओपॅथिक विद्यार्थी येथे निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) म्हणून काम करीत होते आणि डॉक्टर जाधव यांना फोनवरून सूचना देऊन कोविड रूग्णांवर उपचार करीत होते. एका रुग्णाच्या मृत्यूनंतर ते मृत्यूच्या चिठ्ठी देखील लिहित होते, ”असे अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.