सांगलीत पोलीस संरक्षणात असलेल्या साक्षीदाराचा खून करणाऱ्या अट्टल गुन्हेगार म्हमद्या नदाफ याच्यासह २० जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती, उप अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली. संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक करण्यात येत असलेली ही जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई असून या टोळीत दोन महिलांचाही समावेश आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असणारा म्हमद्या नदाफ यांने खंडणीच्या गुन्ह्यातील साक्षीदार मनोज माने याचा ९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता खून केला होता. यानंतर तो फरार झाला.
या कालावधीत त्याला मदत करणारी त्याची पत्नी दिलशाद व प्रेयसी राणी काळेल यांच्यासह १९ जणांवर पोलिसांनी कारवाई केली होती.
गुंड नदाफ याच्यासह त्याच्या टोळीतील सर्व २० जणांवर संघटित गुन्हेगारी कारवाई प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच मोका अंतर्गत कारवाईची शिफारस पोलीस महासंचालकांकडे प्रस्तावित करण्यात आली होती. अपर पोलीस महासंचालकांनी या कारवाईस मान्यता दर्शवली असून या प्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात मोकाअंतर्गत प्रथमच होत असलेल्या कारवाईतील संशयित आरोपी पुढीलप्रमाणे आहेत- म्हमद्या नदाफ, सागर शेंडगे, कमर मुजावर, सूरज उर्फ इब्राहिम नदाफ, जावेद नदाफ, आलमगीर पटेल, शाहबाज मुजावर, इरफान मुल्ला, सोहेल शेख, जुबेर मुजावर, मोहसीन पठाण, वसीम खान, समीर नदाफ, याकुब नदाफ, नीलेश सरगर, अक्षय गायकवाड, मंगेश कांबळे, अक्षय पाटील आणि महिला दिलशाद नदाफ व राणी काळेल.
यापुढील काळात सांगली, मिरज व कुपवाड शहरात संघटित गुन्हेगारी विरूध्द मोकाअंतर्गत कारवाई करण्यात येणार असून अशा काही टोळ्यांच्या कारवाया पोलीस दफ्तरी नोंद आहेत का याची पडताळणी सुरू आहे. अशा तीन संघटित टोळ्या पोलिसांच्या रडारवर असल्याचेही उप अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

two cop suspended over controversy on closing dj
नागपूर: डीजे बंद करण्यावरून वाद, बळाचा वापर करणारे दोन पोलीस निलंबित
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका