News Flash

सदाभाऊ खोत भाजपच्या व्यासपीठावर

भाजप प्रचाराच्या व्यासपीठावर हजेरी लावून भाजपचे निशाण असलेली कमळाची पट्टीही गळ्यात अडकवली.

सांगलीतील भाजपच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते (छाया- इम्रान मुल्ला)

स्वाभिमानीतील उच्चपदस्थ दोन नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या विसंवादाच्या पाश्र्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजप प्रचाराच्या व्यासपीठावर हजेरी लावून भाजपचे निशाण असलेली कमळाची पट्टीही गळ्यात अडकवली. मात्र याबाबत विचारणा होणार हे लक्षात येताच माध्यमांशी बोलणे टाळले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना वगळून अन्य पक्षांच्या प्रचाराला जाण्यास संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी प्रतिबंध घातला होता. मात्र गेल्या आठ दिवसांत जिल्ह्य़ात मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यात पक्षाचे अधिकृत चिन्ह घेऊन १५ जागी संघटनेचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. संघटनेने वाळवा तालुक्यात रयत विकास आघाडीतून उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये बागणी जिल्हा परिषद गटातून राज्यमंत्री खोत यांचे सुपुत्र सागर खोत हे मदानात उतरले आहेत. राज्यमंत्री खोत हे केवळ वाळवा तालुक्यातील प्रचारात सक्रिय राहिले असल्याने शेट्टी यांच्या इशाऱ्यानंतर ते आजच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचार सभेत उपस्थित राहतात की नाही याबद्दल साशंकता होती. मात्र मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर राज्यमंत्री खोत व्यासपीठावर आसनस्थ झाले. आ. शिवाजीराव नाईक यांच्यासमवेत ते बसले होते. पत्रकारांनी आपणाशी बोलायचे आहे, मुख्यमंत्री येईपर्यंत बोला, असा निरोपही दिला. मात्र सभा संपल्यानंतर बोलतो असे सांगत बोलणे टाळले. दरम्यान, व्यासपीठावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आगमन होताच, सर्वच राजकीय नेत्यांच्या गळ्यात भाजपचे कमळ ही निशाणी असलेल्या पट्टय़ा अडकवण्यात आल्या. मात्र लाल रंगाच्या नेहरू शर्टवर संघटनेचा बिल्लाही त्यांनी त्यासोबत कायम ठेवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 12:56 am

Web Title: sangli elections 2017 bjp sadabhau khot
Next Stories
1 सोलापूर जिल्हय़ात दुरंगी-तिरंगी लढती
2 भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची स्वत:च्या जिल्हय़ातच परीक्षा
3 पत्नीसह सासू, सासऱ्यांवर कुऱ्हाडीने वार; धुळ्यातील धक्कादायक घटना
Just Now!
X