सांगलीतील चौगुले रुग्णालयात बेकायदा गर्भपात केले जात असल्याचे उघड झाले असून या प्रकरणी पोलीस आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयावर छापा टाकला आहे. रुग्णालयात सात बेकायदा गर्भपात केल्याचे समोर आले असून संबंधित डॉक्टरांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

चौगुले रुग्णालयावर शनिवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आणि पोलिसांनी छापा टाकला. तपासणीत रुग्णालयात सात बेकायदा गर्भपात झाल्याचे उघड झाले आहे. रुग्णालयात संशयास्पद औषधं व गर्भपाताचे किट सापडले आहे. याशिवाय रुग्णालयात दारुच्या बॉटलही सापडल्या आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.