News Flash

घरपोच मद्य देण्यासाठी सांगलीत पुढाकार

भाजीपाला विक्रेता संघटनेनेची तयारी

(संग्रहित छायाचित्र)

दारूच्या दुकानांवर होणारी प्रचंड गर्दी टाळण्यासाठी विनामोबदला मद्य घरपोच देण्याची तयारी जनसेवा फळे भाजीपाला विक्रेता संघटनेने दर्शवली आहे. संघटनेचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांनी त्यासाठी परवानगी मागणारे निवेदन राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहे.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात काटकर यांनी म्हटले आहे, गेले दीड महिना सांगली जिल्ह्याचे प्रशासन आणि शहरातील व्यापारी गर्दी टाळण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहेत. जनसेवा संघटना कार्यकर्त्यांमार्फत लोकांना सामान्य दरामध्ये भाजी घरपोच करण्याची सोय करीत असून यासाठी प्रशासनाने संघटनेच्या १११ वाहनांना परवानगी दिली आहे. मात्र, दारुसाठी झालेली गर्दी आणि भर उन्हात तासन्तास लोकांना उभे करायला लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाने होणाऱ्या संभाव्य गर्दीचा विचारच केलेला दिसत नाही.

त्यामुळे दीड दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आणि अजूनही तीन दिवसानंतर त्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. ५ फूट अंतरावर एक व्यक्ती उभा करण्याचे धोरण जाहीर झाले असेल आणि दुकानाच्या दारात पाटय़ा बांधल्या असल्या तरी ते पाळले जाईल असे कुठेही दिसत नाही. असेच सुरू राहिले तर सांगली संकटात सापडायला फार वेळ लागणार नाही. जिल्हा प्रशासनाने या बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी असे वाटते.

उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली तर महापालिका क्षेत्रात भाजीपाला विक्रेत्यांच्या गाडय़ा फिरत आहेत. ते मोबदला न घेता केवळ कोरोना रोखण्यासाठी सेवा द्यायला तयार आहेत. मद्य विक्रेत्यांनी ऑर्डर आणि ऑनलाइन किंवा अन्य कोणत्याही मार्गाने पैसे स्वीकारून मद्य ज्यांच्याकडे पोचवायचे त्यांचा पत्ता दिल्यास त्या त्या भागातील विक्रेते भाजीपाला बरोबरच या वस्तूही पोहोच करतील असेही निवेदनात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:11 am

Web Title: sangli initiative to provide home brewed liquor abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुंबईहून सांगलीत आलेल्या दोघांना करोना
2 बांधकामांच्या अडचणी वाढल्या
3 साताऱ्यात करोनाग्रस्तांची संख्या ११५
Just Now!
X