सांगली जिल्हा कारागृहातील ६३ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये तीन महिला कैद्यांचा समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी कारागृहामार्फत ५० वर्षावरील ९४ कैद्यांची करोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये ६३ जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. खबरदारी म्हणून करोनाबाधितसर्व कैद्यांना जेलमध्येच अलगिकरण केले जात आहे. तसेच ५० वर्षांवरील कैद्यांना अन्यत्र ठेवण्यात येत आहे. सांगली जिल्हा कारागृहात एकूण ३२० कैदी आहेत.

तीन दिवसांपूर्वी कारागृह प्रशासनाकडून ५० वर्षांच्या वरील बंदिवान आणि कर्मचारी यांची रॅपिड टेस्ट घेतली होती. या टेस्टचा रिपोर्ट रविवारी रात्री आल्यानंतर जेल प्रशासनाला धक्का बसला. यामध्ये ६३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

sold minor girl for money three people arrested including mother
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीला लाखाला विकले; आईसह तिघेजण अटक
Nashik District Consumer Forum,
नाशिक जिल्हा ग्राहक मंचातील दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात, ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
Hasan Mushrif
आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल – हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरातील ‘मविआ’ला इशारा
fire broke out in huts of sugarcane workers
शिरोळ तालुक्यात ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना आग; प्रापंचिक साहित्य बेचिराख

सांगली महापालिका क्षेत्रात रविवारी १९९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण –
सांगली महापालिका क्षेत्रात रविवारी दिवसभरात कोविड हॉस्पिटल कडून १५० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती मनपा प्रशासनाकडे कळवण्यात आली आहे तर ४९ लोक रॅपिड अँटिजेंन टेस्टमधून पॉझिटिव्ह आले आहेत . अशी एकत्रित रविवारची मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९९ इतकी झाली आहे.  या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी नव्याने सापडलेल्या रुग्णाच्या परिसरात औषध फवारणीसह अन्य खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.