News Flash

सांगली आश्रमशाळा लैंगिक अत्याचार प्रकरण, शिक्षकाला पालकांची मारहाण

मिनाई आश्रम शाळेतील आठ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संस्थाचालक अरविंद पवार आणि महिला शिपाई मनीषा कांबळे यांना अटक केली

सांगली आश्रमशाळा लैंगिक अत्याचार प्रकरण, शिक्षकाला पालकांची मारहाण
कुरळप येथील मिनाई आश्रम शाळेतील आठ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

सांगली जिल्ह्यातील कुरळप येथील आश्रमशाळेतील आठ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर गुरूवारी संतप्त पालकांनी आश्रमशाळेतील एका शिक्षकाला बेदम मारहाण केली आहे. लाथा- बुक्क्यांनी शिक्षकाला मारहाण करण्यात आली असून संस्थाचालकाला मदत केल्याच्या संशयावरुन त्याला मारहाण करण्यात आली.

कुरळप येथील मिनाई आश्रम शाळेतील आठ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संस्थाचालक अरविंद पवार आणि महिला शिपाई मनीषा कांबळे यांना अटक केली आहे. एका निनावी पत्राद्वारे ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाच मुलींनी बलात्कार केल्याची तक्रार केली असून तीन मुलींनी विनयभंग केल्याची तक्रार केली आहे. या आश्रमशाळेत पाचवी ते १२ वी पर्यंतच्या ७० मुली निवासी आहेत.

आश्रमशाळेतील हा प्रकार उघड होताच कुरळप येथे संतापाची लाट उसळली आहे. कुरळप येथे गुरुवारी सकाळपासून कडकडीत बंद आहे. संतप्त पालकांनी शाळेतील एका शिक्षकालाही मारहाण केली आहे. शाळेत घुसून ही मारहाण करण्यात आली आहे. गावातील पालक आणि काही सामाजिक संघटनाच्या महिलांनी आश्रमशाळेत घुसून आश्रमशाळेतील शिक्षकाला मारहाण केली. संबंधित शिक्षक अरविंद पवारला मदत करत असल्याचा संशय असून पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2018 12:56 pm

Web Title: sangli kurlap ashram rape case angry villagers beat teacher
Next Stories
1 किरकोळ कारणावरून महिलेस विवस्त्र करून पतीसह मारहाण
2 पोलीस उपायुक्त श्रीरामेंचा अटकपूर्व जामीन नामंजूर
3 काँग्रेसबरोबर आघाडी करताना चुकांची पुनरावृत्ती टाळू
Just Now!
X