News Flash

विलक्षण! माकडाने हनुमान मंदिरात बजरंगबलीला दंडवत घालत सोडले प्राण, सांगलीतील घटना

वानराने शनिवारीच हनूमानाच्या मूर्तीला दंडवत घालत प्राण सोडल्याने ग्रामस्थ अचंबित...

( फोटो सौजन्य - फेसबुक )

सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावात एक विलक्षण घटना घडलीये. गुंडेवाडी गावातील पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या गाभाऱ्यात शनिवारी सकाळी एका वानराने बजरंगबलीच्या मूर्तीला दंडवत घालत प्राण सोडल्याची अचंबित करणारी घटना घडली.

गुंडेवाडीतील ग्रामस्थही या घटनेमुळे आश्चर्यचकीत झालेत. सध्या गावात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. शनिवारी भाविक बजरंगबलीची मनोभावे पुजा करतात. त्याच शनिवारी एक वानर मंदिरात आल्याने आणि त्याने दंडवत घालून प्राण सोडल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. शनिवारी वानर मंदिरात येऊन हनुमानाच्या मूर्तीला नमन करीत असल्याची बातमी गावात पसरल्यानंतर मंदिरात गर्दी जमली. मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या दारात बसलेल्या माकडाचे भाविक लांबून दर्शन घेऊन जात होते. मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्याच्या उंबऱ्याजवळ माकड बराच वेळ तेथेच बसले. काही वेळानंतर माकडाची हालचाल बंद झाली. माकडाची हालचाल बंद झाल्याने ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहिले असता, माकड गतप्राण झाले होते. नंतर ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाचा जयघोष करत मृत माकडावर मंदिराशेजारीच अंत्यसंस्कार केले.

भाविकांसमोरच माकडाने मूर्तीला दंडवत घालत प्राण सोडल्याने ग्रामस्थ अचंबित झाले. गुंडेवाडीतील पुरातन मारुती मंदिराचा पाच वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराशेजारी झाडावर अनेक माकडे बसतात. सध्या गावात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. शनिवारी भाविक बजरंगबलीची मनोभावे पुजा करतात. त्याच शनिवारी एक वानर मंदिरात आल्याने आणि त्याने दंडवत घालून प्राण सोडल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 9:21 am

Web Title: sangli miraj gundewadi monkey dies at maruti hanuman temple sas 89
Next Stories
1 “महाराष्ट्राला एक नवा पत्रमहर्षी लाभला आहे,” चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका
2 व्याघ्र प्रकल्पाबाहेरील वाघांच्या मृत्यूचे प्रमाण राज्यात सर्वाधिक
3 शिक्षण संस्थांकडून सरकारची कोंडी
Just Now!
X