26 February 2021

News Flash

सांगलीतील प्रेमी युगुलाची आग्राजवळ रेल्वेखाली आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताजमहलसमोर छायाचित्र काढले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

हरोली (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील अल्पवयीन प्रेमी युगुलाने आग्रा (उत्तर प्रदेश) जवळील शाहदरा येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. अयोध्या दिनकर पाटील (वय १५) व झाकीर दिलावर मुजावर (वय १७) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही २३ सप्टेंबरपासून हरोली येथून बेपत्ता झाले होते.
अयोध्या ही दहावीत तर झाकीर हा बारावीला शिकत होता. २३ सप्टेंबरला अयोध्या ही घराकडे परतली नाही. त्यामुळे तिचा शोध घेऊनही ती न सापडल्यामुळे कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. तिचा शोध सुरू असताना झाकीर देखील बेपत्ता असल्याचे समजले. दोघांचे कुटुंबिय त्यांचा शोध घेत होते. दोघेही पळाल्यानंतर आग्रा येथे गेले होते. दोघांनी बुधवारी रात्री आग्रापासून जवळच शाहदरा येथे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. रात्री आठ वाजता हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताजमहलसमोर छायाचित्र काढले होते. शाहदरा पोलिसांनी दोघांचे मोबाईल तपासले. तसेच बॅगेतील कागदपत्रांवरून नातेवाईकांशी संपर्क साधला. दोघांनी आत्महत्या केल्याचे पाहून नातेवाईकांना धक्का बसला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:54 pm

Web Title: sanglis two minor lover did suicide at agara
Next Stories
1 कोल्हापूर जिल्ह्यात जिलेटिनचा शक्तिशाली स्फोट
2 कोपर्डीप्रकरणी दोन दिवसांत दोषारोपपत्र
3 टोमॅटो, मिरचीचे दर कोसळले
Just Now!
X