News Flash

मोदी लाटेमुळे संजय धोत्रे सर्वच विधानसभा मतदारसंघात आघाडीवर

अकोला मतदार संघात भाजपा उमेदवार संजय धोत्रे यांना मोदी लाटेचा भरपूर फायदा झाला असल्याचे दिसून येते. सहा विधानसभा मतदारसंघात एकाही ठिकाणी या निवडणुकीत त्यांना इतर

| May 21, 2014 07:54 am

अकोला मतदार संघात भाजपा उमेदवार संजय धोत्रे यांना मोदी लाटेचा भरपूर फायदा झाला असल्याचे दिसून येते. सहा विधानसभा मतदारसंघात एकाही ठिकाणी या निवडणुकीत त्यांना इतर उमेदवारांच्या मागे रहावे लागले नाही वा इतरांना त्यांच्यापेक्षा जास्त मतेही घेता आली नाहीत. या निवडणुकीने काँग्रेसला पुन्हा पाच वर्षांसाठी वनवासात पाठविले आहे. १९८९ पासून या मतदारसंघात काँग्रेसला सातत्याने अपयश आले आहे.
गेल्या २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बाबासाहेब धाबेकर असतांना प्रकाश आंबेडकरांना बाळापूर व मूर्तिजापूर या दोन विधानसभा मतदारसंघात संजय धोत्रेंपेक्षा प्रत्येकी ५ हजार मतांची आघाडी होती, पण यावेळी या दोनही ठिकाणी आंबेडकर धोत्रेंपेक्षा चांगलेच माघारले, याचा अर्थच असा आहे की, धाबेकर म्हणजे हिंदू उमेदवार असतांना मुस्लिम मतदारांनी आंबेडकरांना त्या दोन ठिकाणी मतदान केले, तर यावेळी काँग्रेसचे हिदायत पटेल उमेदवार असतांना मुस्लिम मते या दोन्ही ठिकाणी आंबेडकरांना मिळाली नाहीत म्हणून ते खूपच माघारले. संजय धोत्रे यांना या निवडणुकीत अकोट विधानसभा मतदारसंघातून ७७ हजार ९६४ मते मिळाली. याच मतदार संघात हिदायत पटेल यांना ४५ हजार ५६०, तर प्रकाश आंबेडकर यांना ३६ हजार १५९ मते पडली आहेत. २००९ मध्ये याच मतदारसंघात संजय धोत्रे यांना ४६ हजार ६०९, तर आंबेडकरांना ३८ हजार ७८५ मते मिळाली होती. यावेळी त्यात घट झाली आहे. मतदार संख्या वाढूनही आंबेडकरांना मागच्या वेळे इतकीही मते मिळाली नाहीत.
बाळापूर मतदारसंघात या निवडणुकीत संजय धोत्रे यांना ६३ हजार ५८७, हिदायत पटेल यांना ४३ हजार २१४ आणि प्रकाश आंबेडकरांना ५४ हजार ४९७ मते मिळाली. म्हणजे या मतदारसंघात सुद्धा ते माघारले. वस्तूत: या ठिकाणी २००९ च्या निवडणुकीत बाळासाहेबांनी धोत्रे यांच्यापेक्षा ५ हजार मते जास्त घेतली होती. ते आधिक्य आंबेडकर यावेळी राखू शकले नाहीत. यावेळी उलट आंबेडकरांना धोत्रेंच्या तुलनेत ९०९० मते कमी पडली. याचा अर्थ असा निघतो की, बळीराम सिरस्कार यांचा येथे प्रभाव पडला नाही व मुस्लिम मते सुद्धा आंबेडकरांना मिळाली नाहीत, तसेच नव काँग्रेसी नारायणराव गव्हाणकरांचा हिदायत पटेल यांना लाभ झाला नाही. हिदायत पटेल यांना या मतदारसंघात धोत्रेंपेक्षा २० हजार ३७३ मते कमी पडली. अकोला पश्चिममध्ये २०१४ च्या निवडणुकीत संजय धोत्रे यांना ७२ हजार ०८३ मते मिळाली, तर हिदायत पटेलांना ५७ हजार ३८० आणि प्रकाश आंबेडकरांना केवळ १६ हजार ८६९ मते प्राप्त झाली. अकोला पूर्व मध्ये संजय धोत्रेंना ८९ हजार ९९१, तर हिदायत पटेलांना केवळ २० हजार ७५२ आणि प्रकाश आंबेडकरांना ५२ हजार ६३० मते पडली. मूर्तिजापूर मतदारसंघात धोत्रेंना ७३ हजार १२७, हिदायत पटेलांना ३५ हजार २४४ आणि प्रकाश आंबेडकरांना ४८ हजार ०५८ मते मिळाली. रिसोड मतदार संघात संजय धोत्रेंना ७९ हजार २२४, तर हिदायत पटेलांना ५० हजार ९०५ व प्रकोश आंबेडकरांना ३० हजार ४७६ मते मिळाली.
या निवडणुकीत प्रथमच धोत्रे यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कायमच आघाडी घेतली. येथे सुरुवातीला धोत्रे व आंबेडकर यांच्यात लढत चांगली होईल, असे मानले जात होते, पण काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला व ही लढत भाजपा व काँग्रेस, अशी झाली, पण त्यातही मोदी लाटेने काँग्रेसचा सफाया केला. हिदायत पटेलांना सर्व स्तरातून मतदान होईल, असे सांगितले जात होते, पण काँग्रेसमधील सुंदोपसुंदी त्यांना बरीच महाग पडली. शिवाय, महागाई, भ्रष्टाचार सरकार दरबारी काम न होणे, अशी अनेक कारणे दिमतीला होतीच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 7:54 am

Web Title: sanjay dhotre wins election from akola
Next Stories
1 दलितांवरील अत्याचाराला रोखून गुन्हेगारांना शिक्षा करण्याची मागणी
2 थूल व डॉ. नितीन राऊत यांची कवलेवाडाला भेट
3 भावना गवळींची पाचही मतदारसंघात
Just Now!
X