News Flash

संजय कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव

अजोय मेहता यांना मुदतवाढ नाही.

राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून, 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.

अजोय मेहता यांची जागी कुणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. तर, गृह विभगाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे व नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परेदशी यांची नावं चर्चेत होती. अखेर संजय कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.  कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याचे दिसत आहे.

अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविड च्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 9:52 pm

Web Title: sanjay kumar is the new chief secretary of the state msr 87
Next Stories
1 अकोल्यात आत्तापर्यंत ७१ करोना बाधितांचा मृत्यू
2 करोना लढाईत शासन-प्रशासनात समन्वय साधायला नेतृत्व दुबळे : फडणवीस
3 राज्यातील रुग्णांचा आकडा १ लाख ४२ हजाराच्या पुढे; दिवसभरात ३,८९० रुग्णांची पडली भर
Just Now!
X