News Flash

वनसंवर्धन ही काळाची गरज – संजय नार्वेकर

वाढते औद्योगिकीकरण आणि प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल ढासळतो आहे.

वाढते औद्योगिकीकरण आणि प्रदूषण यामुळे निसर्गाचा समतोल ढासळतो आहे. त्यामुळे वनसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत अभिनेता संजय नार्वेकर याने व्यक्त केले. ते पेण-हमरापूर येथील अक्षर विद्यालयात आयोजित वृक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

अभिनेता आपला चेहरा वेशभूषा आणि रंगभूषा करून नटवीत असतो. त्याचप्रमाणे सृष्टीचा विद्रूप झालेला चेहरा नटवण्याचे काम वनसंपदा करीत असते. त्यामुळे प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत, असे मत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले. या वेळी अलिबाग वनविभागाच्या उपवनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, शाळेचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील, वनक्षेत्रपाल आर. एस. पवार, पोलीस अधिकारी सकपाळ आणि सरपंच मनीषा भगत उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनील म्हात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

अक्षर विद्यालयात दरवर्षी वृक्षसंवर्धनाचा उपक्रम राबविला जातो. झाडे जगवण्याबरोबरच दरवर्षी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम दर वर्षी शाळेत साजरा होत असतो.

या मोहिमेत सहभागी करून घेतल्याबद्दल नार्वेकर यांनी शाळा प्रशासनाचे या वेळी आभार मानले. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण भावेश घरत,  ऋतुजा नाईक आणि श्रुती मांडलेकर या विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 1:19 am

Web Title: sanjay narvekar comment on forest conservation
Next Stories
1 रायगड जिल्हा रुग्णालय व्हेंटिलेटरवर
2 शेतकऱ्यांकडील दूध थेट ग्राहकांच्या दारात
3 लोणेरेजवळील भीषण अपघातात २ ठार
Just Now!
X