25 September 2020

News Flash

संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेसह खासदार संजय राऊत यांचे बेळगावात स्वागत

बेळगाव येथील व्याखानासाठी आलेले खासदार संजय राऊत यांचे शनिवारी दुपारी बेळगावच्या सांबरा विमानतळावर आगमन झाले

(संग्रहित छायाचित्र)

बेळगाव येथील व्याखानासाठी आलेले खासदार संजय राऊत यांचे शनिवारी दुपारी बेळगावच्या सांबरा विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी उपस्थित शिवसैनिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेने विमानतळ परिसर दणाणून सोडला. खासदार राऊत यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाबाहेर पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

खासदार राऊत यांच्या स्वागतासाठी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत,सेक्रेटरी नेताजी जाधव, सदस्य आई.जी. मुचंडी, कृष्णा शहापूरकर, अनंत जांगळे, अनंत जाधव, नागेश सातेरी, सुनीता मोहिते यांच्यासह मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे शिवसेनेचे हनुमंत मजुकर व अन्य अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर विमानतळ तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत खासदार राऊत यांची बंद खोलीत दहा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर खासदार राऊत आयोजकांनी समवेत थेट मुक्कामाच्या ठिकाणी निघाले. हॉटेलात विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी काही निवडक नेत्यांशी राऊत यांनी चर्चा केल्यानंतर ते ते गोगटे रंगमंदिर येथील नियोजित नाथ पै व्याखानमालेच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.

राऊत यांच्या मुक्काम ठिकाणात बदल

संजय राऊत यांच्या बेळगाव दौऱ्यावरून बेळगाव सीमाभागात प्रचंड उत्सुकता दाटलेली आहे. त्याच वेळी राऊत यांचे बेळगावातील आजचे मुक्कामाचे हॉटेल बदलण्याबाबत पोलिस प्रशासनाने आयोजकांना सांगितले. यापूर्वी राऊत यांच्या मुक्कामासाठी बेळगाव शहरातील क्लब रोड येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. मात्र आता पोलिसांच्या सुचनेनुसार त्यांचा आजचा बेळगावातील मुक्काम शहरापासून काही अंतरावर असलेल्या काकती गावाजवळील मेरेओट हॉटेलात आहे.

कनसेची बकबक

(खासदार संजय राऊत यांचे बेळगाव येथे आगमन झाल्यानंतर शहरात असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. )

बेळगाव येथे काल कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राचे सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची गळचेपी केली होती. आज खासदार राऊत बेळगावात येणार असल्याने कर्नाटक नवनिर्माण सेनेचा नेता भीमाशंकर पाटील याने आपली बकबक सुरु ठेवली. मराठी भाषिकांना कर्नाटकातून महाराष्ट्रात हाकलून देऊ, अशी भाषा वापरली. मात्र त्याच्या बडबडीकडे लक्ष देण्याची गरज नसल्याची भावना बेळगावकरांनी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयाचा मान राखावा – राऊत

व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला प्रचंड पोलीस बंदोबस्तात निघाले. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधताना राऊत यांनी बेळगावात आपणाला कनसेने आपल्याला विरोध दर्शविला असला तरीही, पोलिसांनी योग्य त्या प्रकारची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर, एका कन्नड पत्रकाराने चंदगडचे आमदार राजेश पाटील बेळगावतून आमदार होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी लोकशाही देशात कोणालाही कोठूनही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव सीमा वाद सर्वोच्च न्यायालयात असून न्यायालय बेळगाव सीमाप्रश्नी जो न्याय देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही असेच मत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 6:46 pm

Web Title: sanjay raut in belgaon nck 90
Next Stories
1 इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचा निधी वाडिया रुग्णालयाला द्यावा – प्रकाश आंबेडकर
2 उद्या शिर्डी बंद पण साई मंदिर खुले राहणार
3 २४ जानेवारीला प्रकाश आंबेडकरांनी दिली महाराष्ट्र बंदची हाक
Just Now!
X