20 January 2021

News Flash

संजय राऊतांना उच्च न्यायालयानं फटकारले; कंगनालाही दिली समज

अनधिकृत बांधकाम प्रकरण

संग्रहित छायाचित्र

अभिनेत्री कंगना रणौत हिच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं केलेली कारवाई सूडबुद्धीनेच होती, असं सांगत उच्च न्यायालयानं कारवाई बेकायदेशीर ठरवली. बांधकाम पूर्ण झाल्यावर नोटीस बजावण्यात आली. कोणत्याही नागरिकाविरोधात बळाचा वापर करून केलेली कारवाई मान्य केली जाऊ शकत नाही,” असं न्यायालयानं कारवाईची नोटीस आणि आदेश रद्द केले. त्याचबरोबर या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राऊत व कंगना रणौत यांना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून समज दिली.

अभिनेत्री कंगना रणौतच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम महापालिकेनं पाडलं होतं. पालिकेच्या कारवाईविरुद्ध कंगनानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणाची न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं करण्यात आलेल्या कारवाई बरोबरच शिवसेनेचे नेते संजय राऊत व अभिनेत्री कंगना रणौत यांनी केलेल्या विधानांवरून फटकारले. “कायदा सर्वश्रेष्ठ आहे, याची पर्वा न करता संजय राऊत यांनी कंगनाला धडा शिकवण्याची भाषा केली. असे आचारण एका पक्षाच्या नेत्याला आणि खासदाराला शोभत नाही,” अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

कंगनाला समज

महापालिकेची कारवाई बेकायदा ठरवताना आणि पालिकेच्या कृतीवर ताशेरे ओढताना मुंबईला ‘पाकव्याप्त काश्मीर’ म्हणणाऱ्या तसेच विशिष्ट व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या कंगनालाही न्यायालयाने समज दिली. “एखादी व्यक्ती, सरकार, सरकारी यंत्रणा वा चित्रपटसृष्टीविरोधात बेजबाबदार वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. त्यामुळे कंगनानेही भविष्यात अशी वक्तव्ये करणे टाळावी,” असा सल्ला न्यायालयाने दिला.

न्यायालय म्हणाले..

“एखाद्या नागरिकाने बेजबाबदार वक्तव्ये करून कितीही मूर्खपणा केला तरी सरकार आणि प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरते. ती वक्तव्ये कितीही त्रासदायक असली तरीही प्रशासन कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन वा बळाचा वापर करून कारवाई करू शकत नाही. महापालिकेची कारवाई कायद्याच्या चौकटीत नव्हती, तर कुहेतूने आणि नागरिकांच्या अधिकारांविरोधात होती. बेकायदा आणि राजकीय रंग असलेली कारवाई सरकार वा सरकारी यंत्रणांकडून केली जाणे अधिक गंभीर आहे, त्याकडे दुर्लक्ष करणे समाजाचे नुकसान करणारे असेल,” असं न्यायालयानं स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 9:21 am

Web Title: sanjay raut kangana ranaut bombay high court demolition bmh 90
Next Stories
1 “तपास यंत्रणांचे बळ वापरून महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांना जेरबंद करायचे”
2 सामाजिक दायित्वासाठी समन्वय
3 तक्रारींमुळे बेकायदा बांधकामांवर कारवाई
Just Now!
X