आपली धडाकेबाज शैली आणि निर्भिड वक्तव्यं यामुळे प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत त्यांच्या अशाच एका धडाकेबाज वक्तव्यामुळे. सत्ता, पॉवर म्हणजे काय हे त्यांनी त्यांच्या एका भाषणात उदाहरणासहीत स्पष्ट केलं आहे. हे सांगताना त्यांनी हेही सांगितलं की, नरेंद्र मोदी सुद्धा आपण समोरुन जाताना थांबून चौकशी करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहमदनगर येथे एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी हे विधान केलं. “सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देऊ शकतो. गडचिरोलीला पाठवू का? असा दम देऊ शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मी समोरुन जात असताना मोदी थांबून म्हणतात कैसे हो भाई? याला म्हणतात सत्ता, पॉवर. सुरुवातीच्या काळात आम्ही हाता मार्मिक ठेवायचो. मार्मिक दिसला की लोक समजायचे पॉवर आहे, शिवसैनिक आहे, मग बसायला जागा मिळायची. कारण त्यांना कळायचं की हा शिवसैनिक आहे. मग गुजराती लोकदेखील सामना पेपर सोबत ठेवायला लागले. ज्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, तेही संरक्षणासाठी सामना सोबत ठेवायला लागले. शिवसेना हे सगळ्यांचं प्रोटेक्शन आहे. याला म्हणतात पॉवर.

 हेही वाचा – ‘नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाहीत, तर…’; संजय राऊतांनी राणेंना काढला चिमटा

“शिवसेनेत माज असायलाच हवा. कुणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघासारखं जन्माला आलो, वाघासारखं मरणार, असं सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या”, असंही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले.

राज्यात ओढवलेल्या महापुरानंतर नारायण राणे यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे केले. या दौऱ्यांमध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राणे यांच्याकडून झालेल्या टीकेवरून आता शिवसेनेचे संजय राऊत यांनी राणेंवर प्रहार केला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राऊतांनी राणेंची ओळख शिवसैनिक असल्याचं सांगत चिमटा काढला आहे. ‘शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला, तरी त्याची ओळख शिवसैनिकच असते. त्यात बदल होत नाही’, असं म्हणत संजय राऊत यांनी राणेंना टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut said that modi stops and says hello to me vsk
First published on: 31-07-2021 at 16:54 IST