News Flash

शरद पवार राष्ट्रपती होणार? संजय राऊत लागले कामाला

2022 मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.

महाविकास आघाडी अस्तित्वात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजवणारे संजय राऊत आता नव्या कामाला लागले आहेत. त्यांचं हे नवीन मिशन म्हणजे २०२२ मध्ये शरद पवार यांना राष्ट्रपती पदावर बसवण्याचं आहे. यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंग बांधला आहे.

बिगरभाजपा दलाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार शरद पवार असावेत, अशी आग्रही भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रपतीपद भूषवावं यासाठी संजय राऊत त्यांची सहमती मिळवण्यासाठी मनधरणी करणार आहेत. तसेच बिगरभाजपा दलाच्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांचं पाठबळ मिळवण्याचा ते प्रयत्न करणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची संजय राऊत लवकरच भेट घेणार आहेत. २०२० मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे, त्यावेळी आपल्याकडे पुरसं संख्याबळं असेल असा विश्वास संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

लोकसभेत भाजपाला स्पष्ट बहुमत असले तरी राज्यसभेत त्यांच्याकडे बहुमत नाही. सध्या देशातील राजकीय स्थिती बदलत असून बिगरभाजपा असलेली राज्य राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत महत्वाची भूमिका बजावतील. त्यातच शरद पवार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, तर निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक मतांचे गणित जुळून येऊ शकते, असे मत काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 12:00 pm

Web Title: sanjay raut sharad pawar president indian nck 90
Next Stories
1 JNU Violence: हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे – पार्थ पवार
2 सोलापूर : बलात्कार खटल्यातील पीडित महिला वकिलाच्या खुनाचा प्रयत्न, वकिलाच्या खासगी कार्यालयात घडली घटना
3 मनसेचा झेंडा बदलणार?; राज्यात नव्या ‘राज’कीय समीकरणांची नांदी
Just Now!
X