News Flash

संकल्पित रिपाइं नाशिकमध्ये सहा जागा लढविणार

जिल्ह्य़ात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपाइं’ पक्ष विधानसभेच्या सहा जागा लढविणार असल्याची माहिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पगारे यांनी दिली आहे.

| September 15, 2014 02:09 am

जिल्ह्य़ात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपाइं’ पक्ष विधानसभेच्या सहा जागा लढविणार असल्याची माहिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पगारे यांनी दिली आहे. सिडको-सातपूर, देवळाली, दिंडोरी, देवळा, निफाड, येवला या मतदारसंघांत पक्षातर्फे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे समाजातील उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी संकल्पित रिपाइं सातत्याने नाशिक जिल्ह्य़ात व उत्तर महाराष्ट्रात काम करीत असल्याचे पगारे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
संकल्पित रिपाइंबरोबर आघाडी करण्यासाठी दलित विकास महासंघ, भारतीय बहुजन सेना आदी संघटनांशी चर्चा सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2014 2:09 am

Web Title: sankalpit rpi to contest six seats in nashik
Next Stories
1 ‘पाणी हक्क आणि समन्यायासाठी संघर्ष उभारू’
2 बीड जिल्ह्य़ात पं.स. सभापती निवडींवर भाजपचा वरचष्मा
3 वैचारिक स्पष्टता नसणे हाच पेच -रंगा राचुरे
Just Now!
X