मागील तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ झालीय. मात्र त्यांनी ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका’ असं सांगितलं असल्याने त्यांच्यावर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. शिवशंकरभाऊ यांच्यावर त्यांच्या राहत्या घरीच पूर्ण मेडिकल सेटअपसहीत उपचार सुरू आहेत. त्यांचा रक्तदाब कमी झालेला असून त्यांना कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवशंकरभाऊंनी आयुष्यभर आयुर्वेदिक उपचारालाच प्राधान्य दिल्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंदर्भात बुलढाणा येथील आयुर्वेदतज्ञ डॉ. गजानन पडघान यांनाही तिथे बोलविण्यात आल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant gajanan maharaj shegaon sansthans shivshankar patil is critical but stable scsg
First published on: 03-08-2021 at 11:16 IST