18 February 2019

News Flash

तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या द्यायची, सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात उल्लेख

संत तुकाराम, संभाजी महाराजांची बदनामी सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकातून केली, या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली

सर्व शिक्षा अभियानाच्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त लिखाण असल्याचे वृत्त ताजे असतानाच आता सर्व शिक्षा अभियानाच्या दुसऱ्या पुस्तकात तुकाराम महारांजाबाबत आक्षेपार्ह उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. ‘संतांचे जीवन प्रसंग’ या पुस्तकात तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त उल्लेख असल्याची बाब समोर आली आहे. गोपीनाथ तळवलकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

काय उल्लेख करण्यात आला आहे?
”तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहेमी शिव्याच बाहेर यायच्या. ‘ते आमचं येडं’ असं आपल्या पतीला ती म्हणायची. पण मनाने फार प्रेमळ आणि पतिभक्त. काशी आणि महादू ही त्यांची मुले.” असा उल्लेख या पुस्तकात आहे.

दरम्यान या सगळ्यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला असून संत तुकाराम आणि संभाजी महाराजांची बदनामी सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकातून केली जाते आहे. चुकीची माहिती पुढे पसरवली जाते आहे. अशा मजकुरांमधून चुकीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतो आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.

First Published on October 12, 2018 10:02 pm

Web Title: sarva shiksha abhiyan book controversial lines about tukaram maharaj