News Flash

‘तिचं’ जाणं संपूर्ण महाराष्ट्रासाठीच अत्यंत वाईट बातमी; उदयनराजे यांची भावूक पोस्ट

कोमल आणि तिच्या पतीनं अवयदानासाठी केलं होतं मोठं कार्य

अवयवदानासाठी मोठं काम करणाऱ्या साताऱ्यातील कोमल पवार-गोडसे हिचं आज पहाटे निधन झालं. त्यानंतर कोमलसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. “कोमलचं जाणं ही केवळ सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी आहे,” अशी भावना उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

“सातारा शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार-गोडसे हिला २०१७ मध्ये ‘प्लमोनरी हायपरटेन्शन’ या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले. पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली. कोमल ही महाराष्ट्रातील पहिली दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण झालेली व्यक्ती ठरली होती. पण ३ दिवसापूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे हलवण्यात आले. परंतु आज पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला,” असं उदयनराजे म्हणाले.

“कोमल आणि तिचे पती धीरज दोघांनी ‘कोमल न्यू लाईफ फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली होती. त्यामार्फत त्यांनी अवयवदानासाठी खूप मोठं काम केलं. तसंच गरजूंना सर्वतोपरी मदत केली, जनजागृतीही केली. स्वभावाने अत्यंत प्रेमळ, मनमेळावू, हसतमुख अशा कोमलला सातारा नेहमी स्मरणात ठेवेल. माझ्या अगदी लहान बहिणीप्रमाणे असलेल्या कोमलला भावपूर्ण श्रद्धांजली,” असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

साताऱ्यातील कोमल पवार हिच्यावर डॉक्टरांनी हृदय आणि फुफ्फूस प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध झाले होते तरी त्यासाठी होणारा खर्च मात्र मोठा होता. यासाठी एकून ५० लाखांच्या वर खर्च जाणार होता. परंतु सातारकर आणि काही समाजसेवी संस्थांच्या मदतीमुळे तिच्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. त्यानंतर अवयवदानाचं महत्त्व पटवण्यासाठी कोमल आमि तिच्या पतीनं आपल्या संस्थेमार्फत कार्य सुरू केलं. तसंच त्यांनी याद्वारे अनेक गरजूंना मदतही केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 1:50 pm

Web Title: satara chhatrapati udayanraje bhonsle shares facebook post organ donation komal pawar godse death sister jud 87
Next Stories
1 दुर्दैवी! माजी रणजीपटूचा इगतपुरीजवळ दरीत पडून मृत्यू
2 श्रीमंत लोक लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात – राजेश टोपे
3 पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करु – राजेश टोपे
Just Now!
X