वाई: दोन जर्मन युवकांकडून एका बंगल्यातच गांजा सदृश्य पदार्थाची लागवडीसह व २९ किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत आठ लाख २१ हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी दोन परदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.

दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सातारा जिल्हा विशेष शाखेला वाई शहरात दोन परदेशी नागरीक अनधिकृतरीत्या राहत असल्याची माहिती मिळाली होती. याप्रमाणे पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पारपत्र व व्हिसा याबाबत चौकशी करण्यासाठी सोमवारी रात्री वाई येथील नंदनवन पार्क या सोसायटीतील बंगल्यावर छापा टाकला. त्यांच्याकडे परदेशी नागरिकत्वाचा पुरावा व वीस आढळून आला नाही .या वेळेत त्यांच्या घराची पाहणी करत असताना त्यांच्या घरात गांजा सदृश्य वनस्पती दिसून आल्या. गांजाची लागवड करण्यासाठी घरामध्ये व गच्चीवर ग्रीन हाऊस उभारण्यात आले होते. गांजाची लागवड वाढ करण्यासाठी त्यांनी अद्यावत पद्धत विकसित केली होती. याबाबत ही माहिती पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पाहणी केली. या घरात गांजा सदृश्य वस्तू दिसून आल्यानंतर त्याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक न्याय सहाय्यक प्रयोगशाळेत या तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
Mephedrone manufacturing factory in Sangli was raided by Mumbai Police Crime Branch Mumbai news
उत्तर प्रदेशात प्रशिक्षण घेऊन सांगली एमडीचा कारखाना उघडला; अडीचशे कोटींचे एमडी जप्त, १० जणांना अटक

पोलिसांनी या ठिकाणाहून २९ किलो गांजा व गांजाचे उत्पादन करण्यासाठी वापरला जाणारा माल,दोन दुचाकी असा मिळून आठ लाख २१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .याप्रकरणी दोन जर्मन परदेशी सर्गिल व्हीक्टर मानका (वय ३१) व सेल्सबियन मुलर(२५) युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर यापूर्वी गोवा राज्यांमध्ये अमली पदार्थ विरोधी कायदा अन्वये गुन्हा दाखल आहे.सातारा पोलिसांनी छापा टाकला असता बंगल्यामध्ये गांजा सदृश्य सुमारे अडीचशे झाडं आढळून आली. त्याचप्रमाणे गांजावर प्रक्रीया करणारी संयंत्रणा आढळली.अंमली पदार्थ साठ्याची मोजदाद सोमवारी रात्री पासून सुरूच आहे. याबाबतीत सर्व बाबी विचारात घेऊन तपास करण्यात येईल असे पाटील यांनी सांगितले.हे युवक दोन वर्षापासून या घरात राहून गांजाची लागवड करत होते. घराचे मालक, घर भाड्याने देणारे व परदेशी नागरिकांना या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्यांची ही चौकशी पोलीस करणार असल्याची माहिती धीरज पाटील यांनी दिली. हे दोन्ही तरुण अनेक महिने शेजाऱ्यांच्याही दृष्टीत पडत नव्हते. जवळजवळ सात ते आठ महिन्यांनी ते शेजाऱ्यांना दिसायचे असं सांगण्यात येत आहे या दोन युवकावर गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे करत आहेत.