सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा २०१५-१६ या आíथक वर्षांचा ताळेबंद व नफातोटा पत्रकांना संचालक मंडळाने मान्यता दिली. या सभेतील निर्णयानुसार बँकेस ८८ कोटी ४१ लाख करपूर्व नफा झाला असून बँकेला ३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे तर करोत्तर नफा ७१ कोटी ५७ लाख रुपये एवढा झाला आहे. शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वार्षकि ताळेबंद सादर करण्यात आला.यावेळी बँकेचे संचालक उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार निव्वळ नफ्यातून ,राखीव निधी आठ कोटी ९४ लाख ,शेती पतस्थर्य निधी ४ कोटी ९५ लाख ,इमारत निधी १ कोटी, सेवक कल्याण निधी पन्नास लाख रुपये तर धर्मादाय निधी पाच लाख रुपये इतका आहे. बँकेने केलेल्या तरतुदीत शेतकरी सभासदांसाठी दिले जाणारे एक लाख रुपयांचे अल्पमुदत कर्ज शून्य टक्के, तर त्यापुढे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्जही शून्य टक्के दराने उपलब्ध होणार आहे. मध्यम व दीर्घ मुदतीसाठी दिलेल्या शेती व शेती पूरक कर्जाकरता सभासद पातळीवरील वसूलपात्र हप्त्यावर चार टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील सततच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने उपलब्ध पाण्याचा जास्तीजास्त क्शेत्रासाठी वापर करण्यात यावा. त्याचबरोबर जादा उत्पन्न मिळावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहाहजार सभासदांना साखर कारखाना,सोसायटी यांच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक स्वरुपाचा एकरी ४५ हजार रुपये कर्ज पुरवठा करणे, शेतकरी सभासदांना शेतमालाची साठवणूक करता यावी यादृष्टीने उपलब्ध असलेले गोडावून या करता वखार महामंडळाच्या माध्यमातून परवाना प्राप्त करून गोदाम पावतीवर कर्ज पूरवठा करता यावा यादृष्टीने सध्याचे असलेल्या किमान पन्नास गोडावून या योजने अंतर्गत समाविष्ट करून वखार महामंडळाच्या पावतीवर चार टक्के दराने म्हणजेच पीक कर्जाच्यादरात कर्ज पुरवठा सुरु केलेला आहे. तसेच जिल्ह्यातील वि.का.स. सेवासंस्थांना शेतीमाल साठवणुकीसाठी गोदाम बांधकाम आणि संस्थेची स्वमालकीची इमारत बांधकाम करण्यासाठी बँकेने दिलेल्या कर्जावर गोदाम इमारत बांधकामावर शून्य टक्के कर्ज देण्यात येणार आहे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत १६ हजार १४६ बचत गटांना आता पर्यंत २४.२२ कोटी रुपयांचे कर्ज चार टक्के दरानेदिले आहे.जिल्ह्यातील शेतकर्याच्या मुलांना परदेशात शिक्शणासाठी शुन्य टक्के दाराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे.
बॅंकेने पाच हजार दोनशे सेहेचाळीस रुपयांच्या ठेवी संकलित केल्या आहेत.या शिवाय उंबराठा तिथे खाते हा बँकेचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरुच आहे असे सांगण्यात आले.
आगामीवर्षांत जिल्ह्यातील तीन लाख सोळा हजार ६९३ खातेदारांना अल्पमुदत कर्जासाठी किसान कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व विकास सोसायटय़ा संगणकीकृत करणे आणि कोअर बँकींग प्रणालीशी जोडणे.सभासदांच्या मालाच्या साठवणुकीकरता गोदाम योजना प्रभावी राबवणे व शेतकर्याना गोदाम पावतीवर पीक कर्जाच्या दरात कर्जपुरवठा करणे.जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना एका शाखेतून दुसऱ्या शाखेत रक्कम वर्ग करताना किमान कमिशन आकारण्याचे धोरण राबवले जाणार आहे.