मार्च महिन्यात झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९७.२५ टक्के लागला आहे. मागील वर्षी पेक्षा यंदाच्या निकालात अकरा टक्के वाढ झाली आहे. कोल्हापूर विभागात जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळात कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल ९८.२१ टक्के, साताऱ्याचा ९७.२५ टक्के तर सांगली जिल्ह्याचा निकाल ९७.२२ टक्के असा लागला आहे. इयत्ता बारावी परीक्षेप्रमाणे दहावीतही सातारा जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. जिल्ह्याचा फेब्रुवारी-मार्च-२०१९ चा निकाल ८६.२३ टक्के इतका लागला होता.

यावर्षी जिल्ह्यातील परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या ३९,७८४ होती. त्यांपैकी उत्तीर्ण संख्या ३८,६८८ अशी आहे. सातारा जिल्ह्याचा निकाल ९७.२५ टक्के आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण मुलांची संख्या २०,३२३ (९६.२४ टक्के) तर मुलींची संख्या १८,३६५ (९८.३८ टक्के) अशी आहे.

जिल्हयात विशेष प्राविण्य मिळविलेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १७,०१५ तसेच श्रेणी एकमधील विद्यार्थी संख्या १३,५४३, श्रेणी दोन मधील विद्यार्थी संख्या ६,८२८ तर उत्तीर्ण श्रेणीतील विद्यार्थी संख्या १,३०२ अशी आहे.

जिल्हयातील तालुकानिहाय निकालाची टक्केवारी

जावली (९८.२१), कराड (९७.४२), खंडाळा (९७.९९), खटाव (९७.६५), कोरेगांव (९६.९२), माण (९७.९७), महाबळेश्वर (९८.४७), फलटण (९४.५६), पाटण (९६.७५), सातारा (९७.६२), वाई (९८.२२).

जिल्हयात माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीची परीक्षा केंद्रे ११६ होती. जिल्ह्यातील ७३७ शाळांनी परिक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी केली होती. जिल्ह्यातील रिपिटर विद्यार्थ्यांचा निकाल ७२.८६ टक्के इतका आहे.