सातारा शहरा लगत क्षेत्र माहुली येथे बेकायदेशीर जमाव जमवून बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी कारवाई करत, सहा बैलं व दोन बैलगाड्यांसह चार जणांना ताब्यात घेतले. बैल व बैलगाड्या पोलीस ठाण्यात आणन्यात आल्या आहेत.

बैल गाडा शर्यत आयोजित करण्यास बंदी असताना क्षेत्र माहुली (सातारा) येथील हरण माळावर बेकायदेशीर बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वाळवेकर व उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांनी कारवाई करत घटनास्थळावरून सहा बैल व बैलगाड्या जप्त केल्या. जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यांसमोर आणण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयितांची धरपकड करत चार जणांना ताब्यात घेतले आहे.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

राज्यात बैलगाडी शर्यतीला परवानगी नसताना हा  प्रकार घडला आहे. याचबरोबर राज्यासह  देशात करोना प्रादुर्भावामुळे गर्दी जमविण्यास बंदी असतानाही बेकायदेशीर गर्दी जमा केली गेली होती. बैलांना मारहाण करत अमानुष वागणूक दिली जात होती.  साथ प्रतिबंधक अधिनियमाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे.

करोना संसर्गाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून प्रशासन जनजागृती, काळजी घेण्याचे आवाहन करत असताना गर्दी जमवून आणि कडकडीत बंद असताना बेकायदेशीरपणे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे. शर्यतीचे आयोजन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि बेकायदा शर्यतीबद्दल कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्राणिमित्रांकडून होत आहे.पोलीस शिपाई गणेश घाडगे यांनी सातारा शहर पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली आहे.