News Flash

सातारा : महाबळेश्वर, पाचगणी, वाई, खंडाळ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू; मंदिराच्या कळसावर वीज कोसळली

सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई व खंडाळ्यात भागात आज(रविवार) ढगांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. कवठे (ता.खंडाळा) येथील दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. तर, कळंबे (ता. सातारा) येथील मंदिराच्या घुमटावर वीज कोसळल्याने नुकसानही झाले.
सातारा, पाचगणी, महाबळेश्वर, वाई शहरासह ग्रामीण भागात आज दुपारी जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला. आज दिवसभर नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. सर्वत्र आभाळ भरून आले होते. दुपारी तीन वाजेनंतर पावसाला सुरुवात झाली, अन् काही वेळात मुसळधार पाऊस झाला.

दरम्यान, कवठे (ता.खंडाळा) येथे शेतातील सकाळचे काम संपवून जेवण करण्यासाठी कोपीमध्ये बसलेल्या शशिकांत दादासाहेब लिमन (वय ३५, झगलवाडी ता.खंडाळा) व खाशाबा भाऊसाहेब जाधव (वय ६०,कवठे ता.खंडाळा)  यांच्या अंगावर वीज पडल्याने या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला . या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कळंबे (ता. सातारा) येथील ग्रामदैवत चारशे वर्षांपूर्वीच्या श्री भैरवनाथ मंदिराच्या घुमटावर वीज कोसळून मंदिराचे नुकसान झाले.२००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 9:37 pm

Web Title: satara heavy rains with strong winds in mahabaleshwar pachgani wai khandala msr 87
टॅग : Heavy Rain
Next Stories
1 Coronavirus : राज्यात दिवसभरात ५६ हजार ६४७ नवीन करोनाबाधित, ६६९ रूग्णांचा मृत्यू
2 माजी खासदार दामू शिंगडा यांचे करोनामुळे निधन
3 “जामीनावर सुटला आहात,” ममता बॅनर्जींचं कौतुक केल्याने चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना धमकीवजा इशारा
Just Now!
X