News Flash

घर विकण्यास विरोध केल्याने कराडमध्ये आई आणि भावाची हत्या

राजेश घोडके हे इस्लामपूर येथे भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत होते. त्यांची नुकतीच फलटण येथे बदली झाली होती. ते सोमवारी हजर होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांची हत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

कराड तालुक्यातील मलकापूर येथे घर विकण्याच्या वादातून ४३ वर्षांच्या इसमाने आई व भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी राकेश घोडके (वय ४३) याला अटक केली आहे.

मलकापूरमधील आझाद कॉलनीत जयश्री घोडके ( वय ६३) राहतात. जयश्री यांना दोन मुलं आहेत. राकेश (वय ४३) आणि  राजेश (वय ४०) अशी त्यांची नावे आहेत. राकेशने आईकडे घर विकण्याचा तगादा लावला होता. यावरुन घोडके कुटुंबात वाद होता. तर राजेश घोडके हे इस्लामपूर येथे भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत होते. त्यांची नुकतीच फलटण येथे बदली झाली होती. ते सोमवारी कामावर हजर होणार होते.

मात्र, सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास राकेशने राजेश व जयश्री यांच्यावर गुप्तीने वार केले. गुप्तीने आठ ते दहा वार केल्यानंतरही राकेश थांबला नाही. त्याने अंगणातील लोखंडी पाईप व बादलीनेही त्यांच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात मायलेकाचा मृत्यू झाला. यानंतर राकेशने पत्नीवरही हल्ला केला. यात ती देखील जखमी झाली. या प्रकारानंतर राकेश घराच्या अंगणातच बसून होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कराड शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सतीश जाधव आणि होमगार्ड शेडगे यांनी मोठ्या धाडसाने राकेशला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2018 12:38 pm

Web Title: satara man kills mother and brother over property dispute karad
टॅग : Karad
Next Stories
1 भाजपा आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक, दोन शिवसैनिकांच्या हत्येचं प्रकरण
2 समित्यांच्या मुदवाढीच्या चक्रात कारवाई अडकली
3 आणखी पाच स्थानके लवकरच रोकडरहित
Just Now!
X