News Flash

उदयनराजेंच्या घरातून चांदीच्या बंदुकीची चोरी; चोरट्यास अटक

दोन किलो वजन, किंमत...

उदयनराजेंच्या घरातून चांदीच्या बंदुकीची चोरी; चोरट्यास अटक

खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानातून एकाने तब्बल दोन किलो वजनाची शोभेची चांदीची बंदूक चोरी केली. या घटनेची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिसाला मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेत चांदीची बंदूक जप्त करण्यात आली आहे. याबाबात शाहूपुरी सातारा पोलीस तपास करत आहेत

सोमवारी सायंकाळी एकजण चांदीची बंदूक विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्याचा कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार ते जुना मोटार स्टँड परिसरात गस्त घालत असताना संशयित निदर्शनास आला. याची माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्यातील डीबी पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करून संशयिताला ताब्यात घेतले व शोभेची बंदूक जप्त केली. याची किंमत अंदाचे एक लाख ४ हजार रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातेय.

दीपक सुतार असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, ही बंदूक उदयनराजे यांच्या पॅलेसमधून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2020 10:37 am

Web Title: satara mp udayan raje bhosale antique silver pistol nck 90
Next Stories
1 अर्णब गोस्वामींना फोन पुरवल्याप्रकरणी अलिबाग कारागृहातील दोन पोलिसांचे निलंबन
2 “काँग्रेसनं महाराष्ट्रात ‘हातात’ ‘धनुष्यबाण’ धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला, आता…”
3 “नितीशकुमारांवर ही वेळ तेजस्वी यादव यांनी आणली”