04 March 2021

News Flash

Video : अन् कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे उदयनराजे झाले भावूक

'आले रे, आले रे उदयनराजे'

वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असणारे साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांची हटके स्टाईल, आक्रमकपणा किंवा डायलॉगबाजी नेहमीच पहायला मिळते. उदयनराजे यांचा कार्यकर्त्यांसोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्यकर्त्यांचे प्रेम पाहून उदयनराजे भावूक झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हिडीओमध्ये उदयनराजे एका गाडीत बसलेले दिसतात. त्यावेळी त्यांना त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी रचलेलं ‘आले रे, आले रे उदयनराजे’ हे गाणं ऐकवण्यात येतं. हे गाणं ऐकताना उदयनराजे भावूक झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे गाणं ऐकताना राजेंना आपले अश्रू यावेळी रोखता आले नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 10:53 am

Web Title: satara mp udayanraje viral video
Next Stories
1 सत्तेसाठी अर्ध कमळ छातीवर लावून फिरतील; नीलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा
2 अधिवेशनाच्या निमित्ताने गोवा पर्यटनाचा बेत वाया!
3 राखीव भूखंडांवर अतिक्रमणे
Just Now!
X