साताऱ्यातील वीर धरण परिसरात तोंडल (ता.खंडाळा) गावच्या हद्दीत पार्टीचे आयोजन करत दारू पिऊन हवेत गोळीबार करणाऱ्या बारामती व खंडाळा तालुक्यातील ९ जणांच्या टोळीला शिरवळ पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी किरण देविदास निगडे (वय ४६ रा.गुळूंचे ता.पुरंदर ), सूर्यकांत चंद्रकांत साळूंखे (वय २८, रा. कानिफनाथवस्ती, भादे ता. खंडाळा), नवनाथ बबन गाडे (वय ३४, रा.चोपडज,पोस्ट करंजे, ता.बारामती ), माधव अरविंद जगताप (वय ३२,रा.वाकी पोस्ट करंजे ता.बारामती ), तात्याराम अर्जून बनसोडे (वय ३८,रा.अंथूर्णे ता.इंदापूर जि.पुणे), विजय ज्ञानदेव साळूंखे (वय ३९,रा.चोपडज (सोमेश्वर) पोस्ट करंजे ता.बारामती ), योगेश प्रकाश रणवरे (वय ४२, रा.राख ता.पुरंदर ), वसंत नामदेव पवार (वय ४७,रा.कोळविहीरे ता.पुरंदर ), अरविंद घनशाम बोदेले (वय ४१,सध्या रा.लवथळेश्वर, जेजूरी ता.पुरंदर, मूळ रा.भिवापूर जि.नागपूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
Beer companies face dry day due to water shortage
पाणीटंचाईमुळे बिअर कंपन्यांवर ‘ड्राय डे’चे सावट

यामध्ये किरण निगडे यांच्या मालकीची शासनाची परवान्याची मुदत संपलेली बंदूक, दोन कार, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे किरण निगडे याने स्वत: दहशत पसरविण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार करीत बेकायदेशीररित्या मित्र योगेश रणवरे याला बंदूक दिली व त्यानेही हवेत गोळीबार करत वीर धरण परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत त्यांना पोलिसी खाक्या दाखविला.

याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनचे हवालदार मदन वरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किरण निगडे याच्यासह नऊ जणांविरुध्द शिरवळ पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा , भारतीय शस्ञ अधिनियमांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहे.